Wardha Bus Accident : भरधाव बसचं स्टेअरिंग अचानक लॉक, चालकाचं डोकं चालेना, ST डिव्हायडरला जाऊन धडकली, अन्...

Wardha Drugwada toll Naka Bus Accident : डेपोत गेल्या अनेक वर्षांपूर्वीच्या जुन्या भंगार गाड्या असल्याने ब्रेक फेल होणे किंवा स्टेरिंग लॉक होणे जीवघेणं झालं आहे. भंगार बसेस मुळे नेहमीच अपघात सुरू आहेत.
Wardha ST bus accident near Drugwada toll Naka
Wardha ST bus accident near Drugwada toll NakaSaam Tv News
Published On

चेतन व्यास, साम टीव्ही

वर्धा : वरुडवरून आर्वी येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या वरुड आगाराच्या बसला द्रुगवाडा गावाजवळ भीषण अपघात झालेला आहे. या गावाजवळ असलेल्या टोल नाक्यावरील डिव्हायडरवर भरधाव बस आदळली. यामध्ये बसच्या समोरील भागाचं नुकसान झालं असून प्रवास करणारे सात प्रवासी जखमी झाले आहेत.

बसने वरुडपासून १३ किलोमीटरचे अंतर द्रुगवाडा टोल नाक्यापर्यंत पार केले होते. टोल नाक्याच्या अगदी काही मीटरवर बसचे स्टेअरिंग लॉक झाले. बस सरळ डिव्हायडरवर येऊन आदळली. आवाजामुळे द्रुगवाडा आणि साहूर गावातील नागरिक अपघात पाहण्यासाठी जमा झाले होते. बस क्रमांक एमएच ४० वाय ९१२५ क्रमांकाची बस वरुडवरून आर्वी येथे प्रवासी घेऊन जात होती. या बसमध्ये एकूण सात प्रवासी होते. सातही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना वरुड येथे उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले. बसचालक डी.एन.राऊत यांनी बस कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र स्टेअरिंग लॉक झाल्याने काहीच करता आलं नसल्यानं बस टोल नाक्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली.

Wardha ST bus accident near Drugwada toll Naka
Nashik Crime : दोघे भाऊ प्यायला सोबत गेले, परतला फक्त एकच; नाशिकच्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

डेपोत गेल्या अनेक वर्षांपूर्वीच्या जुन्या भंगार गाड्या असल्याने ब्रेक फेल होणे किंवा स्टेरिंग लॉक होणे जीवघेणं झालं आहे. भंगार बसेस मुळे नेहमीच अपघात सुरू आहेत. यावेळी वाहक म्हणून एस.एम.बुरे हे सेवेवर होते. अपघात होताच एसटी ड्रायव्हर डी.एन.राऊत यांनी आष्टी पोलीस स्टेशनला कळविले. ठाणेदार राजेश जोशी यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Wardha ST bus accident near Drugwada toll Naka
Walmik Karad : वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो, गँग मेंबरच करतील गेम; तृप्ती देसाईंचा मोठा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com