Bogus Cotton Seeds: आता ‘एसआयटी’ खोदणार बनावट बियाणांची पाळेमुळे; पंधरा सदस्‍यांची नियुक्‍ती

आता ‘एसआयटी’ खोदणार बनावट बियाणांची पाळेमुळे; पंधरा सदस्‍यांची नियुक्‍ती
Bogus Cotton Seeds
Bogus Cotton SeedsSaam tv
Published On

चेतन व्‍यास

वर्धा : वर्धेच्या म्हसाळा परिसरातील बनावट कापूस बियाणे कारखाना प्रकरणाच्या तपासकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 'एसआयटी' (स्पेशल इन्व्हेस्टिकेशन टीम) स्थापना केली. (wardha) एसआयटीत पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी एकूण पंधरा सदस्यांची नियुक्ती केली. तपास करणाऱ्या या एसआयटीच्या (Bogus Seeds) प्रमुखसह सदस्यांना प्रत्येक चोवीस तासात केलेल्या तपासाची माहिती पोलीस अधीक्षकांना द्यावी लागणार आहे. (Breaking Marathi News)

Bogus Cotton Seeds
Jalna Crime News: दारू पिण्यास मागितले पन्नास रुपये; नकार दिल्याने केला चाकूने वार

पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी बोगस कापूस बियाण्याच्या कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली. या कारवाईमुळे अनेक शेतकरी फसण्यापासून वाचले आहे. या कारखान्याच्या मुख्य सूत्रधारला अटक करण्यात आली आहे. मात्र हे रॅकेट कुठपर्यंत पोहचले आहे. कोणाला बोगस बियाणे विकण्यात आले, यांचे साथीदार कोण याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी सेवाग्रामचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केली. यात पोलीस निरीक्षक चकाटे हे प्रमुख असून चार पोलीस उपनिरीक्षक आणि दहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रकरणाचा सर्वबाजूनी तपास ह्यावा; याकरिता एसआयटीत स्थानिक गुन्हे शाखा, सायबर यांच्यासह पोलीस (Police) सेवाग्राम स्टेशनचे पोलीस उपनिरक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण ५ अधिकाऱ्यांसह १० कर्मचारीचा समावेश एसआयटीत आहे.

Bogus Cotton Seeds
Shirpur News: मासेमारीच्‍या जाळ्यात अडकून बुडाला; पोहायला गेलेल्‍या एनडीए प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचा मृत्‍यू

या प्रकरणात सध्या दहा आरोपीना पोलिसांनी अटक केली. तर इतर आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले आहे. बोगस बियाण्याच्या कारखानाचा वर्धेच्या पोलीस अधीक्षकांनी भंडाफोड केल्यावर गृहमंत्रीसह कृषीमंत्री यांनी वर्धा पोलिसांना कौतुकाची थाप देत पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन केले. मागील ३ ते ४ वर्षांपासून सुरु असलेल्या बोगस बियाणे कारखान्याकडे कृषी विभागाचे लक्ष न जाणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. हे रॅकेट कृषी विभागातीलचं काही अधिकाऱ्यांच्या मुक संमतीने सुरु होते; अशी चर्चा रंगू लागली आहे. पोलीस त्या दृष्टीने देखील तपास करीत असून या प्रकरणात बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com