Wardha News
Wardha NewsSaam tv

Wardha News: जुनी पेन्शन योजनेसाठी संकल्प यात्रा; सेवाग्राम आश्रमपासून काढली बाईक रॅली

जुनी पेन्शन योजनेसाठी संकल्प यात्रा; सेवाग्राम आश्रमपासून काढली बाईक रॅली
Published on

चेतन व्यास

वर्धा : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने जुनी पेन्शनच्या मागणीसाठी संकल्प यात्रा काढण्यात आली. या अंतर्गत (Wardha) सेवाग्राम आश्रम परिसरातून बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये राज्यभरातील कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. रॅलीदरम्यान पेन्शन मिळण्याच्या घोषणा देण्यात आल्या. (Tajya Batmya)

Wardha News
Shambhuraj Desai: सुषमा अंधारेंना काविळ झाला असावा; शंभूराजे देसाई यांची टीका

जुनी पेन्शन मिळण्याकरिता हा लढा सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतेच सांगितले, की 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे शक्य नाही. यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्काची पेन्शन बंद केली आहे. मात्र मंत्री, आमदार यांची स्वतःची पेन्शन सूरु आहे. स्वतःच्या पेन्शनसाठी मंत्री, आमदार एकत्र येतात. पण कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी कोणताही पक्ष असो सगळे नकार देत आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता हा आंदोलन केला जात आहे. तीन दिवसीय हे आंदोलन असणार असून पेन्शन योजना लागू होईपर्यंत हा लढा सुरु राहील, असं संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. तसेच आज काढलेली बाईक रॅली बुटीबोरीपर्यंत जाणार आहे. सोमवारी बुटीबोरी ते खापरी पायदळ आणि मंगळवारी खापरी ते नागपूर विधीमंडळावर पदयात्रा करून आंदोलन करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com