Wardha News: वाळू माफियांचा हैदोस, नायब तहसीलदारांसह पथकावर हल्ल्याने खळबळ

या प्रकरणी दगडाने हल्ला करत धक्काबुक्की आणि मारहाण करणाऱ्या वाळूमाफियांवर विविध कलमान्वये हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Wardha
Wardha Saam TV
Published On

>> चेतन व्यास

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नायब तहसीलदारांवर वाळूमाफियांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाळूतस्करांवर कारवाईदरम्यान ही घटना घडली आहे. सध्या जिल्ह्याच्या वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरीही वाळूमाफिया हे नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन करून वाहतूक करत आहेत. हिंगणघाट तालुक्यातील डंकीन घाटावर अशाच प्रकारे अवैध वाळूचे उत्खनन होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

माहितीच्या आधारे हिंगणघाटच्या नायब तहसीलदारांसह पथकाने या ठिकाणी धाड टाकली असता पाच वाळूचे टॅक्टर वाळू चोरत असल्याचे निदर्शनास आले. कारवाई सुरु असतानाच वाळू माफियांनी नायब तहसीलदारांसह पथकावर हल्ला चढवत वाहने तेथून पळवून नेली. या प्रकरणी दगडाने हल्ला करत धक्काबुक्की आणि मारहाण करणाऱ्या वाळूमाफियांवर विविध कलमान्वये हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wardha
Vidhan Parishad Election: 'जीत' सत्याची... निकालाआधीच सत्यजीत तांबेंच्या विजयाचे झळकले पोस्टर्स

हिंगणघाट येथील नायब तहसीलदार विजय पवार यांनी पथकासह डंकीन वाळूघाटावर धाड टाकली होती. तेथे पाच ट्रॅक्टर हे वाळू चोरून नेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर कारवाई सुरु असतानाच घटनास्थळावर दुचाकीने जावेद कुरेशी आणि त्याच्यामागे चार इसम धावत आले. कुरेशी याने टॅक्टर चालकांना तुम्ही टॅक्टर घेऊन जा काय आहे ते आम्ही पाहून घेतो, असं म्हणत नायब तहसीलदारसह पथकावर माफियांनी दगड फिरकावला. मात्र अधिकारी यात थो़डक्यात बचावले.

वाळू माफिया तेथून वाहने पळवून नेत असताना अधिकाऱ्यांनी विरोध केला. यामुळे संतापलेल्या ट्रॅक्टर चालकांसह जावेद कुरेशी आणि चार इसमानी नायब तहसीलदारसह पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करत तलाठी संजीव अंबादे यांना मारहाण केली आणि वाहने तेथून पळवून नेली.टॅक्टर पळून जात असल्याचे पथकाने मोबाईलमध्ये चित्रीकरण सुद्धा केले आहे.

Wardha
Jitendra Awhad: मोठी बातमी! 'मला कोणत्याही क्षणी अटक होईल...' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने खळबळ

घटनेनंतर महसूल विभागाच्या पथकने हिंगणघाट पोलीस ठाण्यात पाच टॅक्टर चालकासाह जावेद कुरेशी आणि अनोळखी तीन ते चार इसमाविरोधात हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा करत दगडफेक आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com