Wardha News: पीएम मोदींची सभा संपली अन् नागरिकांची झुंबड उडाली; हाताला मिळेल ते साहित्य पळवले

Wardha PM Modi Sabha : वर्ध्यामध्ये पीएम मोदी यांची सभा झाली. या सभेनंतर या ठिकाणी पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रदर्शन लावण्यात आले होते. हे प्रदर्शन संपल्यानंतर नागरिकांनी वस्तू पळवून नेण्यासाठी गर्दी केली.
Wardha News: पीएम मोदींची सभा संपली अन् नागरिकांची झुंबड उडाली; हाताला मिळेल ते साहित्य पळवले
Wardha PM Modi Sabha Saam Tv
Published On

चेतन व्यास, वर्धा

वर्धामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्वी सोहळा पार पडला. पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्धेच्या स्वावलंबी मैदानात दोन मोठे सभामंडप तयार करण्यात आले होते. एका सभामंडपात पंतप्रधान यांची सभा झाली तर दुसऱ्या सभा मंडपात पीएम विश्वकर्मा योजनेचे अंतराष्ट्रीय दर्जाचे तीन प्रदर्शन लावण्यात आले होते. हे तीन दिवसीय प्रदर्शन संपताच सभा मंडपाचे साहित्य नागरिकांकडून पळविले जात आहे.

लाकडी रॅक, लाकडी बाकडे, महागड्या लाकडी सामग्री, लोखंडी साहित्याची नागरिकांनी लूट केली. पहिले हळूहळू साहित्य पळविले जात होते. मात्र आज सकाळपासून साहित्य पळवण्याचा प्रकार वाढला असून आज थेट कोणी ऑटोत, कोणी दुचाकीवर, कोणी हाथगाडीत तर कोणी पायदळ साहित्य पाळवित असल्याचे चित्र स्वावलंबी मैदानात दिसत आहे.

२० सप्टेंबर रोजी वर्ध्यामध्ये पीएम नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. सोबतच २० ते २२ सप्टेंबर असे ३ दिवस पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्याचे आंतराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमाकरीता कोट्यावधी रुपयांचा निधी प्रशासनाने खर्च केला होता. या मैदानात कार्यक्रमकरिता करण्यात आलेली सजावट, मंडप आणि प्रदर्शनातील साहित्य प्रदर्शन संपल्यावर येथेच होते.

Wardha News: पीएम मोदींची सभा संपली अन् नागरिकांची झुंबड उडाली; हाताला मिळेल ते साहित्य पळवले
PM Modi Visit Pune: पुण्यात पावसाचा हाहाकार! पीएम मोदींच्या दौऱ्याला फटका बसण्याची शक्यता, सभेचे ठिकाण बदलणार?

सुरूवातीला काही नागरिकांनी येथून साहित्य पळवायला सुरूवात केली. साहित्य पळवण्याचे प्रमाण वाढले. दोन दिवस पावसाच्या जोरदार सरी बरसल्या पण आज सकाळपासून पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांनी या ठिकाणी साहित्य पळविण्यासाठी मोठी गर्दी केली. हाताला मिळेल ते साहित्य कोणी टेम्पोतून कोणी दुचाकीवरून तर कोणी डोक्यावर ठेवून घेऊन जात आहेत.

सकाळपासूनच नागरिकांची साहित्य पळविण्याची या ठिकाणी गर्दी केली आहे. नागरिकांकडून उपलब्ध असलेल्या वाहनाने येथून साहित्य पाळविण्याचा प्रकार दिसत आहे. प्रदर्शनासाठी लावण्यात आलेले मोठ मोठे लाकडी प्लायवूड, लोखंडी साहित्य आणि इतर साहित्य नागरिक आपल्या सोईनुसार येथून पळवून नेत आहे.

Wardha News: पीएम मोदींची सभा संपली अन् नागरिकांची झुंबड उडाली; हाताला मिळेल ते साहित्य पळवले
PM Modi Pune Visit: PM मोदींचा पुणे दौरा! शहरातील विविध ठिकाणे पार्किंगसाठी आरक्षित, खासगी उड्डाणांवरही बंदी; वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com