Wardha Crime News : आश्रम शाळेतील विद्यार्थांच्या मृत्यूचे गूढ उलगडले; शाळेतीलच अल्पवयीन मुलाने केली हत्या

Wardha News : आश्रम शाळेतील विद्यार्थांच्या मृत्यूचे गूढ उलगडले; शाळेतीलच अल्पवयीन मुलाने केली हत्या
Wardha Crime News
Wardha Crime NewsSaam tv

चेतन व्यास 

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील स्व. यादवराव केचे आश्रम शाळेत बारा वर्षीय मुलाचा (Wardha) संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. परंतु पालकांनी केलेल्या आरोपाने तपास केला असता शाळेतील मुलाची (Crime News) हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावातील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

Wardha Crime News
Mira Road Police: पोलिसावर हल्ला करून आरोपी फरार; मीरा रोड येथील घटना

वर्धा जिल्ह्यातील नारा येथील स्व. यादवराव केचे आदिवासी आश्रम शाळेत अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यात शाळेतील विद्यार्थी शिवम सनोज उईके याचा खोलीतील गाद्यांखाली संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. घटनेचा कारंजा पोलिसांनी (Police) तपास करत शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत विचारपूस केली असता मृतक शिवम व गावातील १५ वर्षीय विद्यार्थ्याचा वाद असल्याचे तपासात पुढे आले. स्वगावी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिवमचा मारेकरीही होता. 

Wardha Crime News
Parbhani News : शेतीसाठी घेतले कर्ज; कर्ज फेडीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

अखेर दिली कबुली 

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी मुलाच्या वडिलांशी संपर्क साधून विद्यार्थ्याला शाळेत बोलावून घेतले. संशयित विद्यार्थ्याची चौकशी करुन विचारणा केली असता गुन्हा केला नसल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, संशय असल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली असता विद्यार्थ्याने शिवमच्या हत्येची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी शिवमच्या मारेकऱ्यास ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. त्याला वर्धा येथील बाल न्यायालयापुढे हजर केले असता त्याची रवानगी बाल निरीक्षण गृहात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल गाडे यांनी दिली.

यावरून केली हत्या 

घटनेच्या दिवशी आरोपी विद्यार्थ्यांने सकाळी मोबाईल चोरला होता, याची माहिती मृतक शिवमला झाली. शिक्षकांना ही बाब सांगणार तर नाही; अशी भिती असल्याच्या कारणातून शिवमसोबत पेटीतून कपडे काढण्यावरुन वाद केला. शिवमला पेटीची चावी मागितली, चावी न दिल्याने आरोपी विद्यार्थ्याने रागाच्या भरात शिवमला मारहाण करुन फरशीवर पाडले. यात शिवमच्या डोक्याला मार लागून रक्त निघून तो बेशुद्ध पडला. ही बाब शिक्षकांना माहिती होऊ नये, म्हणून आरोपीने शिवमच्या अंगावर गाद्या टाकल्या. अखेर शिवमचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com