Fraud Case : कोर्टाचे बनावट सूचनापत्र बनवून फसवणूक; न्यायालयामार्फत झालेल्या चौकशीत बाब उघड

Wardha News : वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयात ११ जुलै २०२२ रोजी एक प्रकरण बोर्डावर होते. तत्कालीन न्यायाधीशांनी शरद श्रीराम खापर्डे आणि इतर दोन जणांविरुद्ध सूचना किंवा नोटीस काढण्यासाठी कुठलाही आदेश केलेला नव्हता
Fraud Case
Fraud CaseSaam tv
Published On

चेतन व्यास 

वर्धा : जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा असा खोटा व बनावट शिक्का मोहर बनवून आरोपीने सूचनापत्र तयार केले. त्यावर (Wardha) सहायक अधीक्षकांची बनावट स्वाक्षरी करीत ते सरकारी पाकिटात टाकून पोस्टाने इतरांना पाठवून फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयाने सखोल चौकशी केली असता हा प्रकार उजेडात आला. यानंतर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. (Police) पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Breaking Marathi News)

Fraud Case
BJP NCP Banner War : भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवली; आता राष्ट्रवादीने १ लाखाचे बक्षीस द्यावं

वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयात ११ जुलै २०२२ रोजी एक प्रकरण बोर्डावर होते. तत्कालीन न्यायाधीशांनी शरद श्रीराम खापर्डे आणि इतर दोन जणांविरुद्ध सूचना किंवा नोटीस काढण्यासाठी कुठलाही आदेश केलेला नव्हता. हे प्रकरण अर्जदाराच्या सुनावणीसाठी २८ जुलै २०२२ पर्यंत तहकूब केले होते.(Court) मात्र, तरीही आरोपी बाबाराव रंगराव शेंडे (रा. गणेशनगर बोरगाव (मेघे) याने संबंधित व्यक्तींविरुद्ध खोटे व बनावट सूचनापत्र बनविले. त्यावर जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा असा खोटा व बनावट शिक्का मोहर बनवून सूचनापत्रावर उमटवून सहायक अधीक्षकांची खोटी (Fraud) स्वाक्षरी केली. ते सूचनापत्र सरकारी पाकिटात टाकून पाकिटावर देखील जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा असा बनावट शिक्का मारून साध्या पोस्टाने शरद श्रीराम खापर्डे यांना पाठविले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Fraud Case
Agriculture News : उच्च शिक्षित तरुणाची अनोखी शेती; ३ एकर शेतात केली गुणकारी खपली गव्हाची लागवड

सदर सूचना पत्रात शरद श्रीराम खापर्डे याने न्याय दंडाधिकारी प्रथमवर्ग कोर्ट क्र. २ यांच्या समक्ष २८ जुलै २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता हजर राहावे; असा खोटा व दिशाभूल करणारा मजकूर लिहिला होता. तसेच टंकलिखित करून तसेच पे. ता. प्रोसेस नंबर व नोटीस जारी करण्याच्या तारखेमध्ये खोडाखोड करून शरद श्रीराम खापर्डे यांना दहशतीत आणण्यासाठी गैरफायदा करण्याच्या उद्देशाने न्यायालयाचे खोटे सूचनापत्र बनवून त्याचा बेकायदेशीर उद्देशाने वापर केला.

याप्रकरणी आरोपी बाबाराव शेंडे याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वतीने प्रबंधक म्हणून प्रभारी प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालयाचे मनोज चंद्रकांत उदोले यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. आरोपी बाबाराव शेंडे याने न्यायालयाचे बनावट शिक्के आणि स्वाक्षरी मारून सूचनापत्र तयार केल्याची बाब न्यायालयाला समजताच न्यायालयाने सखोल चौकशी केली. चौकशीअंती आरोपीने प्रस्तुत केलेले सूचनापत्र, न्यायालयीन रबरी मोहर आदी खोटे व बनावट तयार केल्याचे निष्पन्न झाले. त्याने बेकायदेशीररीत्या त्याचा वापर स्वतःच्या लाभासाठी केल्याचे समजल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास सांगत गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com