चेतन व्यास
वर्धा : जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्याच्या रेणकापूर येथे मध्यरात्री गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून एक बैल जखमी झाला. तर आग विझवताना शेतकरी (Farmer) व त्याच्या मुलाला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Wardha News Fire Cattle Death)
रेणकापूर (Wardha) येथील शेतकरी आत्माराम निखाडे यांचा त्यांच्या घराजवळ गोठा आहे. गोठ्याला गुरुवारी मध्यरात्री तीन वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटने आग (Fire) लागली. यामुळे गोठ्याला बांधून असलेल्या पाच जनावरांपैकी चार जनावरांचा जळून मृत्यू (Death) झाला. तर, एक बैल गंभीर जखमी झाला. शिवाय या आगीत गोठ्यामध्ये ठेवलेले शेती साहित्यही जळून खाक झाले. गोठ्याला घर लागून असल्याने घरातील फ्रिज, पंखा आणी घरातील पलंगाचे सुद्धा नुकसान झाले असून जवळपास दहा लाखांचे नुकसान झाले आहे.
घरच्यांची पळापळ
अचानक लागलेल्या आगीमुळे घरच्यांची तारांबळ उडाली. ही आग विजविण्यासाठी शेतकरी आत्माराम निखाडे आणी त्याचा मुलगा अशीच निखाडे हे प्रयत्न करत असतांना आगीच्या या रौद्र रूपात दोघांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी समुद्रपूर नगरपालिकेचे पाण्याचे टँकर आणी हिंगणघाट पालिकेच्या अग्निशमक दलाला बोलवून आग आटोक्यात आणली. या घटनेत शेतकऱ्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तातडीने पीडित शेतकऱ्याला मदतीची मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.