Wardha Accident News
Wardha Accident NewsSaam TV

Wardha Accident News: झोपेची डुलकी लागल्याने मोठा अनर्थ; कार पुलावरुन थेट रेल्वे रुळांवर कोसळली, वाहनाचा चक्काचूर

Car Accident News: या अपघातात ५ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
Published on

चेतन व्यास

Car Accident News: वर्ध्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्धा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर भीषण अपघात झालाय. बोरखेडी शिवारात थेट पुलावरून कार खाली कोसळली आहे. या अपघातात ५ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, जाम नागपूर मार्गांवरील बोरखेडी शिवारात रेल्वे ओव्हरब्रिजवरून कार खाली कोसळली आहे. पुलावरून कार कोसळत थेट रेल्वे रुळावर पडली. कार थेट पुलावरून खाली पडल्याने या भीषण अपघात प्रवाशी गंभीर जखमी झालेत.

Wardha Accident News
Acidity Tablets Side Effects : सावधान! अॅसिडिटी झाल्यावर औषधे खाऊन होऊ शकतो किडनीला धोका? जाणून घ्या तज्ञांचे मत

अपघातात (Accident) जखमी झालेल्या व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचं समजलं आहे. प्रवाशी आपल्या कुटुंबासह हैद्राबाद येथून नागपूरच्या दिशेने जात होते. अशात अचानक त्यांची कार पुलावरुन खाली कोसळली. जाम महामार्गावरील अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

नागपूर जिल्ह्याच्या बुट्टीबोरी येथील माया रुग्णलयात जखमींना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, कार पुलावरुन खाली पडल्याने कारचा पूर्णता चेंदामेंदा झाला आहे. झोपेची डुलकी लागल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती जाम महामार्ग पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी दिली आहे.

Wardha Accident News
Kolhapur Crime News: धक्कादायक! एकमेकांकडे बघण्यावरुन वाद; आईसह दोन मुलांना बेदम मारहाण

श्रेया बैस (वय 29), कवीशा काकडे, वय 27, ब्रोनदूत रोगो, वय -24, राहणार - नागपूर, मोहम्मद सादिक, वय -32, राहणार -हैद्राबाद, साईद युसूफ, वय -35,राहणार -हैद्राबाद हे वरील पाच जण जखमी आहेत. मोहम्मद सादिक हा कार चालवत होता त्याला झोपेची डुलकी लागल्याने कार अनियंत्रित होत खाली कोसळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com