Walmik Karad: जेलमध्ये राडा, कराडच्या हत्येचा कट? कराड मारहाणीची इनसाईड स्टोरी

Walmik Karad: बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराडच्या हत्येचा कट शिजत असल्याचं सांगितलं जात आहे. बीडच्या आकाला कोण मारणार आहे, काय आहे मारहाणीची इनसाईड स्टोरी? हे जाणून घेऊ.
Walmik Karad
Walmik KaradSaam Tv
Published On

सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर बीडच्या कारागृहात हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. जेलमधील बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेने कराड आणि घुलेला मारहाण केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. बीड कारागृहात नेमकं काय घडलं? पाहूयात.

बीडच्या जेलमध्ये काय झालं?

सकाळी 10.30 ते 11मध्ये नाष्ट्यासाठी कैदी एकत्र

महादेव गित्ते आणि अक्षय आठवले कराडच्या अंगावर धावून गेले

कराडवर हल्ला झाल्याने घुले मध्ये पडला

गित्ते आणि आठवलेने कराडला 2 कानशिलात मारल्या

कराडनं खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून मारहाण

कराड आणि घुलेवरचा हल्ला टोळीयुद्धातून झाल्याचं सुरेश धसांनी म्हटलंय. तर या प्रकरणी कारवाईची मागणी अंजली दमानियांनी केलीय. कराडवर हल्ला करणारा महादेव गित्ते हा मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणी अटकेत आहे. एवढंच नाही तर तो बबन गित्तेचा राईट हँड आहे.या हल्ल्यानंतर याच शशिकांत उर्फ बबन गित्तेने फेसबुकवर मरना और मारना सबकुछ माफ है, अशी पोस्ट केलीय..तुरूंगात कराडला आव्हान देणारा बबन गित्ते कोण आहे? पाहूयात

कोण आहे बबन गित्ते?

मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी

बबन गित्ते गेल्या 9 महिन्यांपासून फरार मात्र सोशल मीडियावर सक्रीय

बबन गित्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष

ऑगस्ट 2023मध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं नियुक्तीपत्र

राष्ट्रवादी प्रवेशावेळी गाड्यांचा मोठा ताफा नेल्यानं चर्चेत

कराड आणि बबन गित्ते यांच्यात जुनी दुश्मनी

बीडमधल्या या टोळ्यांमधलं युद्ध आता थेट कारागृहाच्या आत सुरु झालंय. त्यामुळे बीडमध्ये नवं अंडरवर्ल्ड तयार होतंय का? बीड कारागृहात कराड टोळीयुद्ध होईस्तोवर पोलीस प्रशासन नेमकं काय करत होतं? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे बीडमध्ये तुरुंगाच्या आतल्या आणि बाहेरच्या टोळ्या संपवण्याचं मोठं आव्हान बीड पोलिसांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com