Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला सोडून सर्वांना मकोका; सरपंच हत्येप्रकरणी 8 आरोपींना मकोका, वाचा सविस्तर

walmik karad News : वाल्मिक कराडला सोडून सर्वांना मकोका लागला आहे. तर सरपंच हत्या प्रकरणात ८ आरोपींवर मकोका लागला आहे. मात्र, या यादीतून वाल्मिकला वगळल्याने त्याच्यावरही मकोका लावण्याची मागणी केली जात आहे.
Walmik Karad
Walmik Karad NewsSaamTv
Published On

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सर्व आठ जणांना मकोका लावण्यात आलाय. मात्र दोन कोटी रूपयांच्या खंडणी प्रकरणात तुरूंगात असलेल्या वाल्मिक कराडला यातून वगळण्यात आलंय. कराड हाच देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांचा आहे. मात्र त्याला यातून वगळण्यात आल्यामुळे देशमुख कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केलीय. हत्या प्रकरणात मकोका लावलेले आठ आरोपी कोण आहेत ते पाहूयात....

विष्णू चाटे

जयराम घाटे

प्रतीक घुले

महेश केदार

सुदर्शन घुले

सुधीर सांगळे

सिद्धार्थ सोनावणे हे अटकेत असलेल्या सात आरोपींसंह फरार असलेल्या कृष्णा आंधळेवरही मकोका लावण्यात आलाय. हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या या सर्व आरोपींवर आधी अपहरणाचा गुन्हा होता. मात्र पोलिसांवर टीका झाल्यानंतर या सर्वांवर नंतर ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र वाल्किम कराडवर ३०२ आणि मकोका लावण्यात आलेला नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांसह आमदार सुरेश धस यांनी कराडला मकोका आणि ३०२ लावण्याची मागणी केलीय.

Walmik Karad
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात ७ आरोपींवर मकोका, वाल्मिक कराड हत्या प्रकरणातील आरोपी नाही

संघटित गुन्हेगारीसाठी मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते. त्यामुळे आता या सर्वांवर मकोका कायद्याअंतर्गत खटला चालवण्यात येणार आहे. काय आहे मकोका काय ते पाहूयात...

मकोका कायद्यातील तरतुदी?

1) 1999 मध्ये मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा

2) संघटीत गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी कायदा अस्तित्वात

3) आरोपींवर दहा वर्षांत दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं

4) खंडणी, अपहार, हप्ते वसुली, तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास मकोका

5) मकोका कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही

6) पाच वर्षे ते जन्मठेप याशिवाय पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद

Walmik Karad
Santosh Deshmukh Case: मारहाणीचा बदला आणि ग्रुप व्हिडिओ कॉल; सरपंच हत्या प्रकरणी चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप बीडमधल्या सर्व पक्षीय नेत्यांचा आहे. मात्र पोलिसांनी ना त्याच्यावर ३०२ अंतर्गत कारवाई केली ना आता त्याला मकोका लावला. त्यामुळे कराडवर नेमका कुणाचा वरदहस्त आहे आणि पोलीस अजूनही देशमुख हत्या प्रकरणात दबावामुळे कारवाईला टाळाटाळ करत आहेत का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com