Vivah Muhurat news: देशभरात सर्वत्र लग्नाचा धुमधडाका पाहायला मिळत आहे. मराठी नववर्ष गुढीपाडव्याला सुरु झाल्यानंतर यंदा पहिलाच लग्नमूहूर्त ३ मे रोजी होता. राज्यात लग्नसराईला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा २८ जूनपर्यंत शेवटचा मुहूर्त असणार आहे. तर मे आणि जून महिन्यात केवळ १७ मुहूर्त आहेत. (Latest Marathi News)
राज्यातही अनेक ठिकाणी लग्नांचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, यंदा लग्नासाठी २८ जूननंतर मुहूर्त नसल्याची माहिती समोर आली आहे. तर २८ जूननंतर आषाढी चातुर्मासापासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. त्यानंतर हा मुहूर्त कार्तिकी एकादशीपर्यंत असतो. देशभरात त्या चार महिन्यांच्या कालावधीत लग्न फार कमी होतात. त्यामुळे लग्नाळू मंडळींना नोव्हेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. या चार महिन्यानतंर थेट २५ नोव्हेंबर रोजी विवाहमुहूर्त आहे.
यंदा कोणाचा २८ जूनपर्यंतचा मुहूर्त हुकल्यास लग्नासाठी २५ नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. तर यावर्षीच्या ३१ डिसेंबर रोजी शेवटचा मुहूर्त असणार आहे. त्यामुळे यंदा मे आणि जून महिन्यात लग्नांचा एकच धुमधडाका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात लग्नासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड पाहायाला मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लग्नासाठी मुहूर्त अधिक आहेत. त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने वधू-वर विवाहबंधनात अडकतील. मे आणि जून महिन्यात लग्नासाठी मुहूर्त अधिक आहेत. या दोन्ही महिन्यात लग्नाचे १७ मुहूर्त आहेत.
या दोन महिन्यात मुहूर्त अधिक असल्याने लग्न करणाऱ्यांच्या संख्येत मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता आहे. मुहूर्त अधिक असल्यामुळे लग्न कार्यालये, बँक्वेट हॉल लग्नाची धामधूम पाहायला मिळेल.
मुहूर्त संख्या अधिक असल्याने लग्नकार्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच व्यवसायिकांना चांगलाच फायदा मिळण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्ण घटल्याने आता देशात नियममुक्त लग्नसोहळ्याचे प्रमाण वाढले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.