Maharashtra Weather Update : मुक्काम वाढला! आठवडाभर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा, मुंबईत पुढच्या 3 ते 4 तासांत बसरणार सरी

Weather Forecast : पुढच्या आठवडाभर राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Maharashtra Weather News
Maharashtra Weather NewsSaam Tv

IMD Alert: राज्यावर असलेले पावसाचे सावट (Maharashtra Rain) अद्याप संपलेले नाही. या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) ऐककडी राज्यभरातील जनेतेची उकाड्यापासून सुटका झाली. पण नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. गेल्या महिनाभरापासून पडणारा अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढला आहे. पुढच्या आठवडाभर राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Maharashtra Weather News
Beed News : मंदिराचा जीर्णोद्धार करताना सापडलं सोन्याचं कासव; पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांमध्ये आठवडाभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील 3 ते 4 तासांत मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather News
Rohit Sharma On Loss: दारुण पराभवानंतर हिटमॅन भडकला! 'या' खेळाडूला कारणीभूत ठरवत सांगितलं पराभवाचं कारण

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मोचा चक्रीवादळ तयार झालं आहे. यामुळे अंदमान, निकोबार, केरळ आणि तामिळनाडू या भागात 12 मेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी या भागात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात देखील होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागाांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather News
America Firing: टेक्सासच्या शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; 9 जण ठार

मोचा चक्रीवादळाचा (Cyclone Mocha ) प्रभाव आता हळूहळू दिसून येत आहे. हे चक्रीवादळामुळे आज अनेक राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने या वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली असून अनेक राज्यांमध्ये अलर्ट देखील जारी केला आहे. मोचा चक्रीवादळ बंगलादेशच्या किनारपट्टीला 11 ते 15 मे दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागांमध्ये 8 ते 11 मे दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com