Rohit Sharma On Loss: दारुण पराभवानंतर हिटमॅन भडकला! 'या' खेळाडूला कारणीभूत ठरवत सांगितलं पराभवाचं कारण

Rohit Sharma Statement: पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने पराभवाचं कारण सांगितलं आहे.
Rohit sharma
Rohit sharmasaam tv
Published On

CSK VS MI IPL 2023: चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुबंई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला वानखेडेच्या मैदानावर झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्ण संधी होती.

मात्र या सामन्यात देखील मुबंई इंडियन्स संघाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या सामन्यात मुंबईला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने पराभवाचं कारण सांगितलं आहे. (Rohit Sharma On Loss)

Rohit sharma
Arjun Tendulkar Net worth: कोट्यवधींचा वारसदार असणाऱ्या अर्जुनची स्वतःची संपत्ती किती?

सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की,' आम्ही फलंदाजी करताना जास्त धावा करू शकलो नव्हतो. त्यामुळे गोलंदाजांना बचाव करण्यासाठी जास्त धावा उरल्या नव्हत्या. फलंदाजीसाठी आजचा दिवस खूप वाईट होता.

आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. आम्हाला मधल्या फळीत फलंदाजांची गरज होती. दुर्दैवाने आज तिलक वर्मा नव्हता. त्यामुळे आम्हाला फिरकी गोलंदाजी विरुद्ध खेळणाऱ्या फलंदाजाची गरज होती.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'पियुष चावला चांगली गोलंदाजी करतोय. संघातील इतर गोलंदाजांनी त्याला साथ द्यायला हवी. प्रत्येकाने पुढे येऊन योगदान द्यायला हवं. या हंगामात आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होत नाहीये. स्पर्धेत कुठलाही संघ जिंकतोय आणि पराभूत होतोय. आम्हाला खेळाच्या तीनही विभागात चांगली कामगिरी करायची आहे. आम्हाला येणारे २ सामने घरच्या मैदानावर खेळायचे आहेत.' (Latest sports updates)

Rohit sharma
Cheteshwar Pujara: पुजारा म्हणजे शंभर नंबरी सोनं! IPL ला लाथ मारत पठ्ठा गाजवतोय इंग्लंडचं मैदान

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना नेहाल वाढेराने ६४ धावांची खेळी केली.

तर सूर्यकुमार यादवने २६ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर मुंबईने ८ गडी बाद १३९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून डेवोन कॉनव्हेने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली.

तर ऋतुराज गायकवाडने ३० धावांची खेळी केली. मुंबईला या सामन्यात ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com