Ankush Dhavre
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अर्जुन तेंडुलकर सध्या चर्चेत आहे.
तब्बल २ वर्षे वाट पाहिल्यानंतर त्याला मुंबई इंडियन्स संघासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे.
सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेल्या अर्जुन तेंडुलकरची स्वतः ची संपत्ती किती? जाणून घ्या.
सचिनचा मुलगा असूनही अर्जुन तेंडुलकर स्वतःची संपत्ती ही कोट्यवधींच्या घरात आहे.
त्याची एकूण संपत्ती २१ कोटी रुपये इतकी आहे.
तर दरमहा तो ३० लाखांची कमाई करतो.
मुंबई इंडियन्सने त्याला २०२१ मध्ये झालेल्या लिलावात २० लाख तर २०२३ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात ३० लाखांची बोली लावत संघात स्थान दिले होते.
अर्जुन तेंडुलकर अजूनपर्यंत जाहिरातींमध्ये झळकला नाहीये. मात्र लवकरच तो जाहिरातींमध्ये झळकताना दिसून येऊ शकतो.
अर्जुनच्या कार कलेक्शन बाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाहीये. मात्र अनेकदा तो लक्सरी कारमध्ये फिरताना दिसून आला आहे.