Residents and BJP leaders handing over the suspect to police after the superstition-based attack in Vita town.
Residents and BJP leaders handing over the suspect to police after the superstition-based attack in Vita town.Saam Tv

माजी आमदार आणि नगराध्यक्षाच्या घराबाहेर भानामती, ऐन ZP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ

Sangli Vita Political Incident 2026: सांगली जिल्ह्यातील विटा शहरात माजी आमदार सदाशिव पाटील आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर करणी भानामतीसारखे साहित्य फेकल्याची धक्कादायक घटना घडली.
Published on
Summary

विटा शहरात माजी आमदार आणि भाजप नेत्यांच्या घरासमोर करणी भानामतीसारखे साहित्य फेकल्याची घटना घडली.

नागरिकांनी आरोपीला पकडून भोंदू बंगालीसह पोलीस ताब्यात दिले.

सोशल मीडिया आणि स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे मोठा खळबळ उडाली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाची पातळी खाली गेल्याचे चित्र स्पष्ट झाले.

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली: ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील विटा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. माजी आमदार सदाशिव पाटील आणि भाजपचे नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर करणी भानामतीसारखे साहित्य फेकण्यात आले. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी त्वरित कारवाई करत एका स्थानिक व्यक्तीला पकडले. भाजपाचे नेते वैभव पाटील आणि नागरिकांच्या सहभागाने आरोपीला भोंदू बंगालीसह पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

सामाजिक माध्यमांवर ही घटना मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या काळ्या जादूच्या प्रयोगामुळे विटा शहरात जोरदार खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस तपास सुरू असून, पुढील कारवाईसाठी आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

Residents and BJP leaders handing over the suspect to police after the superstition-based attack in Vita town.
गिरीश महाजनांना प्रजाकसत्ताक दिनाचं भाषण भोवणार; प्रकाश आंबेडकरांनी घेतली आक्रमक भूमिका

राज्याचे राजकारण सध्या कुठल्या थराला चालले आहे असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणाचा थर इतका खाली चालला आहे की हाणामारी, बी फॉर्म पळवणे, फॉर्मची लपवालपवी करणे यामुळे राजकारणाची पातळी जी खाली घसरली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर आहे. अशातच आता सांगलीमध्ये झालेल्या प्रकारामुळे पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात चालले काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com