Virar News: पोहण्याचा मोह जीवावर बेतला! विरारच्या पापडखिंड धरणात ३ मुले बुडाली; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

रविवारी सुट्टी असल्याने हे सर्वजण पापडखिंड धरणावर फिरायला गेले होते.
Virar News
Virar NewsSaamtv

Virar News: विरारच्या फुलपाडा येथील पापडखिंड धरणात पोहण्यासाठी गेलेले तीन मुले बुडाल्याची घटना समोर आली आहे. त्यापैकी स्थानिकांनी दोघा मुलांना वाचवले, मात्र ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली असून या दुर्देवी प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Virar Latest News)

Virar News
Saptashringi Fort Landslide: सप्तशृंगी गडावर मोठी दुर्घटना! दरड कोसळून २ भाविक जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, विरार पूर्वेला (Virar East) फुलपाडा येथे महापालिकेचे पापडखिंड नावाचे धरण आहे. रविवारी सुट्टी असल्याने वसंत बोराडे पत्नी, मुलगा तसेच शेजारील अन्य दोन मुलांसह पापडखिंड धरणावर फिरायला गेले होते.

संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास त्यावेळी ओम बोराडे (११) आणि त्याचे दोन मित्र अंश (१२) आणि वंश( ११) पाण्यात बुडू लागले. स्थानिकांच्या मदतीने वंश आणि अंश यांना वाचविण्यात यश आले. मात्र ओम पाण्यात बुडून मरण पावला. याप्रकरणी रात्री ११ वाजता विरार पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Virar News
Sangli News : शेकडाे शेतक-यांसह भाजपच्या माजी आमदाराने राेखला विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग; कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर लक्ष

दरम्यान, पापडखिंड धरणातून विरार शहराला दररोज १ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. या धरण परिसरात फिरण्यासाठी तसेच पाण्यात पोहण्यासाठी बंदी आहे. मागील आठवड्यात याच धरणात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com