Vinod Ghosalkar vs Manisha Chaudhary , Dahisar Vidhan Sabha Exit Poll 2024: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मनीषा चौधरी यांनी काँग्रेसच्या अरूण सावंत यांना हरवून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता. यंदाही भाजपचा हा किल्ला अभेद्य राहणार की काही वेगळं चित्र पहायला मिळणार , याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण दहिसर विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचाच आमदार विजयी होईल, असं दिसतेय.एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये भाजपच्या उमेदवाराचे पारडे जड असल्याचा दिसून येत आहे. दहिसरमध्ये ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार बदलला होता. त्याचा फटका बसल्याचे दिसतेय.
दहिसर मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जात होता. पण मागील 10 वर्षांपासून भारतीय जनात पक्षाने या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व निर्माण केलेय. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांत भाजपच्या मनिषा अशोक चौधरी विजयी झाल्या. आताही दहिसरकरांनी भाजपच्याच उमेदवाराला कौल दिल्याचं दिसतेय. दहिसरमध्ये मनीषा चौधरी आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांच्यात थेट सामना झाला होता.
विनोद घोसाळकरांना सहानभुतीची मते मिळतील का? की मनीषा चौधरी पुन्हा बाजी मारणार, याबाबत २३ मार्च रोजी निकाल स्पष्ट होईल. एक्झिट पोलनुसार, दहिसरमध्ये भाजपचा विजय होईल असे दिसतेय. दहिसर येथे मनसेचे राजेश येरुनकर यांच्यामुळे ठाकरेंच्या सेनेला पराभवाचा धक्का बसेल, असे चित्र दिसतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.