Political News: आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची होतेय मागणी; नेमकं काय आहे यामागचं कारण?

Health Minister Tanaji Sawant: सर्वच प्रकरणात कडक कारवाईची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध नोंदवत त्यांनी सभात्याग देखील केला.
Tanaji Sawant
Tanaji SawantSaam tv
Published On

Nagapur News:

गडचिरोली व बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाला. याला आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vaddetivar) यांनी आज विधानसभेत केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Tanaji Sawant
Nashik Crime News : सख्खा भाऊ बनला वैरी; मालमत्तेसाठी लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करत वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यात झालेल्या चर्चेत वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढत जोरदार हल्लाबोल केला.

गडचिरोली (Gadchiroli) शहरातील जिल्हा स्त्री व बालरूग्णालयात सिझेरियन प्रसूतीनंतर श्रीमती रजनी प्रशांत शेडमाके व श्रीमती उज्वला नरेश बुरे या दोन महिलांचा मृत्यू झाला. झालेला मृत्यू डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय.

बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालय व अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही ठिकाणी उपचारासाठी आलेल्या श्रीमती विद्या निलेश गावंडे या तरुणीचाही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. या सर्वच प्रकरणात कडक कारवाईची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध नोंदवत त्यांनी सभात्याग देखील केला.

Tanaji Sawant
Mumbai Crime News: मोठ्या बहिणीच्या घरी आला अन् मंगळसूत्र घेऊन फरार झाला; भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com