Vidhan Sabha Election: ठाकरे राज्यात 288 मशाली पेटवणार? ठाकरे विधानसभा स्वबळावर लढवणार?

Uddhav Thackaeray : लोकसभेत अधिक जागा लढवूनही मित्रांपेक्षा कमी जागा जिंकल्यामुळे उद्धव ठाकरे आता विधानसभेसाठी जोरदार कामाला लागले आहेत. एवढंच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्व 288 विधानसभांच्या जागांवर तयारी करण्याचं ठरवलंय. उद्धव ठाकरेंनी सर्व संपर्कप्रमुकांना सर्व मतदासंघांचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत....त्यावरचा हा विशेष रिपोर्ट
Vidhan Sabha Election: ठाकरे राज्यात 288 मशाली पेटवणार? ठाकरे विधानसभा स्वबळावर लढवणार?
Vidhan Sabha Election Uddhav Thackaeray
Published On

विनोद पाटील, साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं मविआत सर्वाधिक जागा लढवल्या. मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना जोरदार कामाला लागलीय. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांच्या बैठकांचा सपाटा सुरू केलाय. राज्यातल्या सर्व 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. यात उद्धव ठाकरेंनी सर्व मतदारसंघांचा अहवाल मागवलाय. यात त्यांनी काय सूचना दिल्या आहेत ते पाहूयात.

288 मशाली पेटवणार?

25 वर्षांपूर्वीची आक्रमक शिवसेना भाजप आणि विरोधकांना दाखवा

विधानसभेच्या तयारीला लागा

संपर्कप्रमुखांनी 288 विधानसभा मतदारसंघांचा अहवाल सादर करावा

स्वतंत्र विधानसभा लढल्यास काय होईल याचा अहवाल तयार करा

लोकसभेत मित्रपक्षांच्या पदाधिका-यांनी शिवसेनेचं काम केलं की नाही?

कोणते विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल?

मतदारसंघातील संभाव्य उमेदवार कोण असावा? याबाबतही अहवाल सादर करण्याचे आदेश उद्धव ठाररेंनी संपर्कप्रमुखांना दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि पवारांच्या सहानुभूतीचा काँग्रेसला सर्वाधिक फायदा झाल्याची चर्चा रंगली होती. लोकसभेत सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे काँग्रेस जागावाटपात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मित्र पक्षांवर दबाव टाकण्यासाठी सर्व जागांचा अहवाल मागवून आतापासूनच सर्वाधिक जागांवर दावा करण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय.

तसंच विधानसभेत जनतेच्या सहानुभूतीचा फायदा आपल्याच पक्षाला कसा होईल याची आतापासूनच उद्धव ठाकरे खबरदारी घेताना दिसतायत. मात्र राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या मदतीनं मशाल तेवत ठेवणार की स्वत:च 288 मशाली पेटवणार याबाबत उत्सुकता लागलीय.

Vidhan Sabha Election: ठाकरे राज्यात 288 मशाली पेटवणार? ठाकरे विधानसभा स्वबळावर लढवणार?
RSS vs BJP: संघाच्या मुखपत्रातून भाजपला कानपिचक्या; भागवतांनंतर ऑर्गनायजरनं भाजपला सुनावलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com