Vidhan Parishad Election:विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 नेत्यांमध्ये रस्सीखेच, एकनाथ शिंदे कोणाला देणार संधी?

MLC Elections 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन जागांसाठी सहा नेत्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. राजकीय समीकरणे बदलत असल्याने आता सर्वांचे लक्ष एकनाथ शिंदे यांच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.
MLC Elections 2026:
Political leaders gear up for the Maharashtra Vidhan Parishad elections as competition intensifies for limited seats.saam tv
Published On
Summary
  • विधान परिषद निवडणुकीसाठी १० जागांची घोषणा

  • शिवसेनेच्या २ जागांसाठी ६ नेत्यांमध्ये चुरस

  • एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

निवडणूक आयोगाने गुरुवारी विधान परिषदेच्या एकूण १० जागांसाठी निवडणूक जाहीर केली. उमेदवारीसाठी नेत्यांकडून फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा आली आहे. त्या जागेसाठी उद्धव ठाकरेंचे नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचं स्पष्टपणे वर्चस्व दिसत आहे.

दरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचा समावेश आहे. या नेत्यांना पुन्हा संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. परंतु शिवसेनेच्या वाट्याला २ जागा येत असून त्यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यातील एका जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित असल्याचेही म्हटलं जात आहे.

MLC Elections 2026:
Maharashtra Politics: विधान परिषदेत मोठा ट्विस्ट; उद्धव ठाकरे नाही तर 'या' दोन नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा, कोणाला मिळणार संधी?

शिंदे गटाकडे विधानसभेत ५७ आमदारांचे संख्याबळ असल्याने ते दोन जागा सहज जिंकू शकतात. एका जागेसाठी नाव निश्चित असल्याच म्हटलं जातंय. तर दुसऱ्या जागेसाठी रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी आणि दिपक सावंत ही नावे आघाडीवर आहेत. या दोन जागांसाठी आता सहा जणांची नाव चर्चेत आलेली आहेत.

६ नेत्यांकडून उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. राज्यसभा हुकलेल्या आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेते मंडळी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकं कुणाला उमेदवारी देणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

कुणाची नाव चर्चेत आहेत

शायना एनसी, शितल म्हात्रे, नीलम गोहे यांची नाव सध्या चर्चेत आहेत, यासह अभिजीत अडसूळ संजय मांडलिक भाऊसाहेब चौधरी यांचीही नाव चर्चेत आहेत.

दरम्यान पक्षीय बलाबलाचा विचार करता विधानसभेतील सध्याच्या आमदारांच्या संख्येनुसार एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी सुमारे २८ ते २९ मतांच्या कोट्याची गरज भासणार आहे. महायुतीकडे असलेल्या संख्याबळामुळे भाजप ६ जागा सहज निवडून आणू शकते. शिवसेना (शिंदे गट) दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एक तर महाविकास आघाडी एक जागा सहज जिंकू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com