

डॉ. जयसिंगराव पवार यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी निधन
ते मराठेशाही इतिहासाचे ज्येष्ठ संशोधक होते
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावर त्यांचं महत्त्वपूर्ण संशोधन
महाराष्ट्रातील मराठेशाहीचा अभ्यासक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज गुरुवारी पहाटे दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी डॉ. जयसिंगराव पवार यांनी अखेरचा श्वास घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्यावर अत्यंत महत्त्वाच्या संशोधनाचा कार्य ज्येष्ठ इतिहासकार आणि अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केलं. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी आज गुरुवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला.
डॉ. पवार यांनी मराठेशाहीच्या इतिहासावर महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. त्यांनी त्यांच्या लेखनातून आणि संशोधनातून मराठा साम्राज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोठं कार्य केलंय. इतिहास क्षेत्रातील त्यांचं योगदान अमूल्य मानले जातंय. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीये.
डॉ. जयसिंगराव पवार कोण होते?
डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगलीच्य तडसरमध्ये झाला. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. पुढे तीन दशकांहून अधिक काळ कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापन केलं. या काळात त्यांनी महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 20 क्रमिक पुस्तके लिहिली. ते शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. तसेच त्यांनी इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव पवार यांच्या संशोधन कारकिर्दीला 1964 मध्ये सुरुवात केलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.