
राज्यात थंडीचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे भाज्यांच्या किंमतीदेखील वाढत आहे. थंडी वाढत असल्याने भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. शेवगा आणि लसूणच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
ऐन थंडीत लसणाच्या किंमतीत वाढ जाली आहे. किरकोळ बाजारात लसूण ५०० रुपये किलोला विकल्या जात आहेत. त्याचसोबत कांद्याच्यादेखील किंमती वाढल्या आहेत.कांद्याच्या किंमती १०० ते ११० दरम्यान आहेत.
भाज्यांच्या किंमती
सध्या बजारात शेवगा ४०० रुपये किलोवर विकले जात आहे. वांगी ६० रुपये किलोंवर विकले जात आहे. अदरक १०० रुपये किलोवर विकले जात आहेत. लिंबू ११५ रुपये किलोवर विकले जात आहेत. दूधीची किंमत ५१ रुपये आहे. भाज्यांच्या किंमती वाढल्याने गृहिणींना आता भाजी घ्यायची की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धाराशिवच्या भुम तालुक्यात ढगाळ वातावरण व हवेतील बदलामुळे ऐन बहरातील तुरीला मोठा फटका बसु लागला आहे त्यात धुक्याचेही प्रमाण वाढले आहे यामुळे तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव होणे सुरू झाले आहे.यंदा तालुक्यात जुन महीन्यापासुन चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. मागील दोन तीन वर्षात पुरेशा पावसाअभावी खरीप व रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता.वातावरणाचा परिणाम तुर पिकावर होत असल्याचे प्रमाण वाढले आहे यामुळे शेतकर्यांनी तुरीवर अळीच्या नियञंणासाठी निंबोळी अर्क,प्रोफेनफॉस,इमामेथिन,बेनझॉइडची फवारणी करावी व फवारते वेळी तोंडाला मास्क लावुन आरोग्याची काळजी अस आवाहन कृषी विभागाने केलय.
सीसीआयकडून कापूस खरेदी केला जात आहे. कापसाला ७५२१ उच्चांकी दर मिळाला असून आतापर्यंत जिंतूर तालुक्यात ९ हजार ३८१ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.जिंतूर तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. यातून हाती आलेल्या कापसाची शेतकरी विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन येत आहेत. काल प्रथमच ७५२१ रुपयांचा भाव शेतकऱ्याला मिळाला. सीसीआय लिलावात कापूस खरेदी होत आहे.यावर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सीसीआयद्वारे ८७८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून, खासगी व्यापाऱ्याद्वारे ८५०३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. तालुक्यात ९३८१ क्विंटल कापसाची आतापर्यंत खरेदी झाली आहे. (Cotton Price News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.