Shocking News : रेशनच्या धान्यात आढळली उंदराची विष्ठा; बुरशी लागलेले गहू-तांदुळ पाहून महिला प्रचंड संतापल्या

Vasai Ration Shop News : रेशनमधील धान्यात उंदराची विष्ठा आणि खडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार वसईतून समोर आला आहे. बुरशी लागलेले धान्य पाहून महिलांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
 रेशनच्या धान्यात आढळली उंदराची विष्ठा
Vasai Ration Shop NewsSaam TV
Published On

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही वसई

केंद्र आणि राज्य सरकारकडून गरीब आणि गरजू व्यक्तींना कमी किमतीत रेशनचं धान्य दिलं जातं. देशभरातील कोट्यवधी लाभार्थी रेशनमधून मिळणाऱ्या गहू आणि तांदुळावर आपले पोट भरतात. पण याच रेशनमधील धान्यात उंदराची विष्ठा आणि खडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुरशी लागलेले धान्य पाहून महिलांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

 रेशनच्या धान्यात आढळली उंदराची विष्ठा
Kharip Hangam : कृषी केंद्राची तपासणी मोहीम; बोगस बियाणं, वाढीव दराने विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

वसईतील ससूनवघर गावात हा प्रकार घडला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील सरकारमान्य दुकानातून अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे रेशन मिळत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. खराब रेशन देऊन सरकार आमच्या आरोग्याशी खेळ करतंय का? असा सवालही महिलांनी उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ससूनवघर गावातील महिला धान्य घेण्यासाठी रेशन दुकानावर गेल्या होत्या. यावेळी दुकानदाराने त्यांना सवलतीत गहू आणि तांदुळाचे वाटप केले. मात्र, हे धान्य बुरशी लागलेलं होतं. याशिवाय धान्यात उंदराची विष्ठा आणि बरेच खडेही आढळून आले.

हा सर्व प्रकार समोर येताच महिला चांगल्याच संतापल्या. जीवन छाया फाऊंडेशन या राशन दुकानातून वितरित करण्यात येणारे हे धान्य आम्ही गुरा ढोरांनाही खायला देऊ शकत नाही, असा संताप महिलांनी व्यक्त केला. गावातील शेकडो महिलांनी एकत्रित येऊन या घटनेचा निषेध केला.

दरम्यान, या सर्वप्रकरणात पुरवठा अधिकारी जबाबदार आहे. रेशनच्या नावाखाली त्यांनी काळाबाजार सुरू केला आहे. हा काळाबाजार तातडीने बंद करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. या प्रकाराची महिती वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना दिली असता त्यांनी या प्रकनाच्या चौकशीच्या आदेश दिले आहेत.

 रेशनच्या धान्यात आढळली उंदराची विष्ठा
Bhandara News : रोहयोच्या कामावर बोगस मजूर; रोजगार सेवकांनी लाटले शासनाचे पैसे, तुमसर तालुक्यातील प्रकार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com