Walmik Karad surrender: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामुळे बीड जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी मास्टरमाईंट वाल्मीक कराड यांनी पुणे शहर पोलिसांकडे सरेंडर केले आहे. देशमुख हत्याप्रकरणापासून वाल्मीक कराड फरार होता. त्याने आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
वाल्मीक कराडच्या आत्मसमर्पण प्रकरणावर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी सोनावणे यांनी केली होती. ते म्हणाले, "मी माझ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त होतो. माध्यमांकडूनच मला ही माहिती मिळाली आहे. हत्या प्रकरणामध्ये संबंध असल्यास वाल्मीक कराडला अटक व्हायला हवी. कोणत्या गुन्हाअंतर्गत अटक करावी हे पोलिसांनी पाहायला हवे.
"९ तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली. या घटनेला आता वीस-बावीस दिवस झाले. जर खंडणीचा गुन्हा होता, तर त्याने आधीच आत्मसमर्पण करायला हवं होतं. त्याने सीआयडीसमोर आता सरेंडर केले आहे", असे म्हणत बजरंग सोनावणे यांनी अटकेच्या संदर्भात प्रश्न केले.
भाजपाचे आमदार सुरेश धस यांनीही याप्रकरणावर आपले मत मांडले. ते म्हणाले, "धनंजय मुंडे आणि वाल्मीक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वाल्मीक पळून पळून कुठपर्यंत पळणार होता? राज्याच्या मुख्यंमंत्र्यांनी धडाधड निर्णय घेतले. संपत्ती जप्त केल्याने, खाती गोठवल्याने त्याने शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला. बाकी आरोपींनाही लवकरात लवकर अटक करावी. हे प्रकरण उज्ज्वल निकम यांच्यासारखा तगडा वकील दिला जावा. फास्टट्रॅकवर ही केस चालवली जावी, चार्जशीट दाखल करुन अंडर ट्रायल चालणं महत्त्वाचं आहे अशी अपेक्षा आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.