Student Shot Teacher: बापरे! विद्यार्थ्यांनी शिक्षकावर झाडली गोळी; रील बनवत व्हिडीओ केला व्हायरल

Uttar Pradesh Crime: गोळी लागल्यावर उपस्थित अन्य व्यक्तींनी शिक्षकाला रुग्णालयात दाखल केले.
Bihar Crime News
Bihar Crime Newssaam tv
Published On: 

Student Crime News:

उत्तर प्रदेशच्या आगरा येथून गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकावरच गोळी झाडलीये. गोळी लागल्यावर उपस्थित अन्य व्यक्तींनी शिक्षकाला रुग्णालयात दाखल केले. सध्या शिक्षकावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजले आहे. (Latest Crime News)

Bihar Crime News
Pune Crime News: शाहरुख खानला अटक; पुण्यात फसवलं अन् राजस्थानमध्ये अडकला

विद्यार्थ्यांची मुजोरी एवढ्यावरच थांबली नाही. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला आणि तो व्हायरलही केला. व्हिडीओमध्ये या विद्यार्थ्यांनी म्हटलंय की, "बंदूकीत ४० गोळ्या होत्या एक मारलीये आणि ३९ बाकी आहेत. महिन्याभरानंतर पुन्हा त्याला गोळी मारणार" असं या तरुणांनी म्हटलं आहे.

ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशच्या आगरामधील खंदौली येथे घडलीये. पोलीस आयुक्त पश्चिमी सोनम कुमार यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी क्लासजवळ जाऊन उभे राहिले. त्यांनी शिक्षकाला काही कारणास्तव बाहेर बोलवून घेतले. शिक्षक बाहेर आल्यावर या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पायावर गोळी झाडली आणि तेथून पळ काढला.

शिक्षकाचा मोठा भाऊ आणि विद्यार्थी यांच्यात काही कारणास्तव वाद झाल्याचं म्हटलं जातंय. भावाशी असेल्या भांडणाचा विद्यार्थ्यांनी शिक्षकावर हल्ला करून बदला घेतलाय, अशीही चर्चा होतेय.

पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी टीम तयार केली आहे. गावात सध्या आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आसं पोलिसांनी म्हटलंय.

Bihar Crime News
Nashik Crime: नाशिकमध्ये मोठी कारवाई; ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या भावाच्या कारखान्यावर छापा; १३२ किलो एम. डी. ड्रग्स जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com