Uttam Jankar Resignation: ...तर मी आमदारकीचा राजीनामा देणार; शरद पवार गटाच्या उत्तम जानकरांनी स्पष्टच सांगितलं

Uttam Jankar Resignation over ballot paper: मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्यासाठी मालशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी मोठं पाऊल उचललं आहे. उत्तम जानकर लवकरच राजीनामा देणार आहेत.
 Uttam Jankar
Uttam Jankar Saam Tv
Published On

मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यासाठी माळशिरसचे राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार उत्तम जानकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. अशातच आमदार उत्तम जानकर आता आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. निवडणूक आयोगाकडे उत्तम जानकर राजीनामा सोपवणार असल्याची माहिती आहे.

मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्यासाठी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी मोठं पाऊल उचललं आहे. उत्तम जानकर लवकरच राजीनामा देणार आहेत. तसेच जंतर मंतरवर त्यांनी आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे. मागणी मान्य न झाल्यास २३ जानेवारीपासून दिल्ली येथील जंतर मंतर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.

 Uttam Jankar
Amravati Crime: काळं फासलं, मिरचीची धुरी अन् नग्न अवस्थेत धिंड, जादुटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय महिलेसोबत अमानुष प्रकार

धानोरेत हात वर करून मतदान

मारकडावाडीनंतर धानोरे गावात ईव्हिएम विरोधात आवाज उठवण्यात आला होता. माळशिरस तालुक्यातील धानोरे गावातील ग्रामसभेने ईव्हीएम विरोधात ठराव मांडला होता. त्यावेळी उत्तम जानकार यांना मतदान झालं होतं. त्यावेळी प्रत्यक्ष मतदान आणि ग्रामसभेतील मतदानात २४३ मतांचा फरक पाहायला मिळाला होता.

 Uttam Jankar
Solapur-Pune Highway: सोलापूर-पुणे महामार्ग आता सहापदरी होणार, ३ उड्डाणपूल; सोलापूर-पुणे-सोलापूर प्रवास करा सुसाट!

धानोरे गावातील १२०६ नागरीकांनी ईव्हीएम विरोधात प्रतिज्ञापत्र सादर केलंय. धानोरेमधील मतदारांनी हात वर करून मतदान केलं होतं. त्यात १२०६ मतदारांनी हात वर करून मतदान केलं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत ९६३ मते मिळाली होती. जर मॉक पोलसाठी परवानगी मिळणार नसेल तर, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या अटीवर, आमदारकीचा राजीनामा मुख्य निवडणूक आयुक्त यांना देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच २३ जानेवारीपासून दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन करणार असल्याचा इशारा जानकरांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com