UPIचा भार, QRला नकार! व्यापाऱ्यांना हवी कॅश, ग्राहक बेजार

UPI Payment Fee Sparks Merchant Protest: केंद्राच्या UPI वरील अतिरिक्त शुल्काच्या निर्णयाला दिल्लीपासून गल्लीपर्यंत विरोध होतोय. व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे देशातील ग्राहकांसमोर नवं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. सरकारच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांनी काय भूमिका घेतलीये?
UPI CHARGES ROW
UPI CHARGES ROWsaam tv
Published On

एकीकडे, सणासुदीच्या काळात ग्राहकांची बाजारपेठांमध्ये मोठी रेलचेल पाहायला मिळते. तर दुसरीकडे, ऐन गणेशोत्सवात केंद्र सरकारनं 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर 0.4 टक्के एमडीआर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. मात्र, याच यूपीआय व्यवहारांवरील अतिरिक्त शुल्काविरोधात आता व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांनी दुकानांवरील क्युआर कोड हटवत या निर्णयाचा निषेध नोंदवलाय. अतिरिक्त शुल्काची भीती व्यक्त करत व्यापाऱ्यांनी हे शुल्क त्वरित मागे घेण्याची मागणी केलीये... तर उल्हासनगर शॉपकिपर असोसिएशननं केंद्राच्या निर्णयाला विरोध करत थेट केंद्र अर्थमंत्र्यांना साद घातलीये.

एव्हढंच नव्हे तर व्यापाऱ्यांनी युपीआय व्यवहारांनाच नकार दिल्यानं ग्राहकांना कॅशनं व्यवहार करावा लागतोय. त्यामुळे यापुढे बाजारात व्यवहार करताना ग्राहकांना कॅश बाळगावी लागणार आहे. त्यासाठी वारंवार एटीएममध्ये जावं लागणार आणि एटीएमच्या शुल्काचा भुर्दंड भरावा लागणार. त्यामुळे आता ग्राहकही बेजार होण्याची शक्यता आहे.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतील व्यापाऱ्यांनी युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय. अनेक व्यापाऱ्यांनी तर आपल्या दुकानांवर 'नो UPI' असेही फलक लावले आहेत... शुल्क लागू केल्यामुळे कॅशचा वापर पुन्हा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र, असं असलं तरी UPI व्यवहारांवर लादण्यात येणारा MDR व्यापारी ग्राहकांवर लादणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपायांचा विचार करतंय. मात्र तोपर्य़ंत व्यापारी आणि ग्राहकांमध्ये वाद पेटण्याची चिन्ह् आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com