Maharashtra Rain: निवडणूक प्रचाराला पावसाचा फटका! ठाकरे आणि फडणवीस यांच्या सभा रद्द

Maharashtra Politics: राज्यभरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ठिकठिकाणी अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
निवडणूक प्रचाराला पावसाचा फटका! ठाकरे आणि फडणवीस यांच्या सभा रद्द
Unseasonal Rain in MaharashtraSaam Tv

Unseasonal Rain in Maharashtra:

राज्यभरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ठिकठिकाणी अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर याचा फक्त राजकीय पक्ष आणि नेत्यांनाही बसला आहे. पावसामुळे अनेक नेत्यांनी आपल्या नियोजित सभा रद्द केल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांची सभा रद्द

आज उद्धव ठाकरे यांची डोंबिवली येथे सभा होणार होती. मात्र अवकाळी पावसामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. आताची सभा 16 तारखेला पुन्हा डोंबिवलीत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सभेसाठी मैदानाचा शोध सुरू, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते वरून सरदेसाई यांनी दिली आहे.

निवडणूक प्रचाराला पावसाचा फटका! ठाकरे आणि फडणवीस यांच्या सभा रद्द
Maharashtra Rain News : राज्यभरात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचं थैमान; मुंबईत धुळीचं वादळ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा रद्द

यातच आज घाटकोपर येथे देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार होती. मात्र घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडल्याने ही सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ही सभा आज रात्री ८ वाजता मुलुंड येथील कॅम्पस हॉटेल चौकात होणार होती.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज पालघरमध्ये सभा पार पडली. सभा पार पडल्यानंतर ते पुढील प्रवास हेलिकॉप्टरने करणार होते. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील होते. मात्र खराब हवामानामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि अमित शाह यांनी हेलिकॉप्टरने जाणं टाळलं. त्यांनी पुढील प्रवासासाठी ते कारने रवाना झाले आहेत.

निवडणूक प्रचाराला पावसाचा फटका! ठाकरे आणि फडणवीस यांच्या सभा रद्द
Mumbai Local Train News: वादळी पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वेसेवा विस्कळीत; नोकरदारांचे हाल

यातच आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. राज्यातील 11 जागांवर मतदान झालं. राज्यातील अवगकाली पावसाचा फटका मतदानावर होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे. याआधीच्या तीन टप्प्यातही राज्यातील मतदानाचा टक्का घसरला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com