Unemployment : भारतात बेरोजगारीचं संकट भीषण, सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये बेरोजगारी दर वाढला

सप्टेंबर पेक्षा ऑक्टोबर मध्ये बेरोजगारी दर वाढला आहे.
Unemployment : भारतात बेरोजगारीचं संकट भीषण, सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये बेरोजगारी दर वाढला
Published On: 

शिवाजी काळे

नवी दिल्ली - भारतात दिवसेंदिवस बेरोजगारीचं संकट भीषण बनत चाललं आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर मध्ये बेरोजगारी (Unemployment) वाढली आहे.सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने याबाबतची आकडेवारी जारी केली आहे. एकीकडे महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य मेटाकुटीला आले असताना, दुसरीकडे देशातील बेरोजगारीचा दरही उचांकीवर पोहोचला आहे. (Unemployment In India)

Unemployment : भारतात बेरोजगारीचं संकट भीषण, सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये बेरोजगारी दर वाढला
मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; तब्बल ३ तास चर्चा

ऐन सनासुदीच्या काळात लोक बरोजगार झाल्याची माहिती केंद्र सरकारच्या आकडेवारीमधून समोर आली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर पेक्षा ऑक्टोबर मध्ये बेरोजगारी दर वाढला आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या माहितीनुसार १९ ऑक्टोबर पर्यंत देशातील बेरोजगारी दर ७.८६% इतका नोंदवला गेला आहे. तर सप्टेंबर मध्ये हाच बेरोजगारी दर ६.४३% इतका होता. त्यामुळं ऐन सनासुदीच्या काळात लोकांच्या हातचं काम गेल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे ग्रामीण भारतात बेरोजगाराचे प्रमाण शहरी भागा पेक्षा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही चिंतेची बाब मानली जात आहे.

ग्रामीण भागातील बेरोजगारी दर

एप्रिल 7.18%

मे 6.63%

जून 8.07%

जुलै 6.17%

ऑगस्ट 7.68%

सप्टेंबर 5.84%

ऑक्टोबर 8.01%

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.