Ulhasnagar : खिडकीत बसलेली दोन मुले दुसऱ्या मजल्यावरून कोसळली; ग्रील तुटल्याने घडली घटना

Ulhasnagar News : उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गांधी रोडवर परिसरात सदरची घटना घडली आहे. गांधी रोड परिसरात हरे कृष्णा इमारत असून त्यातील दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटमधून हे दोन्ही मुले खाली कोसळली आहेत
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv
Published On

उल्हासनगर : घरात खेळत असलेली दोन चिमुकले घरातील खिडकीत बसून बाहेर गंमत पाहत होती. खिडकीत खेळत असताना बाहेरून लावलेली लोखंडी ग्रील अचानक तुटल्याने तोल जाऊन दोन्ही मुले दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली. उल्हासनगरमध्ये घडलेल्या या घटनेत दोन्ही मुले जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गांधी रोडवर परिसरात सदरची घटना घडली आहे. गांधी रोड परिसरात हरे कृष्णा इमारत असून त्यातील दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटमधून हे दोन्ही मुले खाली कोसळली आहेत. फ्लॅटमध्ये खेळत असताना दोन्ही चिमुकले खिडकीत बसून खेळत होते. खिडकीच्या ग्रीलला धरून बसले असताना अचानक लोखंडी ग्रील तुटली. यामुळे दोघांचाही तोल गेल्याने ते खाली जमिनीवर कोसळले. 

Ulhasnagar News
Jalna Water Crisis : जालन्यात पाणीटंचाईच्या झळा; दोन मध्यम प्रकल्प कोरडेठाक, बदनापूर तालुक्यात भीषण स्थिती

दोघे रुग्णालयात दाखल 

जमिनीवर पडल्याने दोघेजण जखमी झाले आहेत. यात एक सात वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी आहे. त्यापैकी सात वर्षीय मुलाचे दात पडले असून डोक्यालाही इजा झाली आहे. तर मुलीला किरकोळ इजा झाली आहे. दोघांना लागलीच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Ulhasnagar News
Pune Cyber Crime : पुण्यातील ६० वर्षीय महिला झाली डिजिटल अरेटस्ट, तब्बल अडीच कोटी रुपये लुबाडले

सुदैवाने जीव वाचला 

घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मुलांना उचलले. तसेच मुलांचे आई- वडिलांनी त्यांना रुग्णालयात नेले. सुदैवाने बिल्डिंगच्या कंपाउंडला असलेल्या पत्र्यांवर ही ग्रील कोसळल्याने मुलांचा जीव वाचला आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावरून अस्लेल्यूए फ्लॅटची जास्त उंची नसल्याने मुलांचा जीव वाचला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com