पूरग्रस्तांना दिलासा देताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली 'ही' भिती

uddhav thackreay
uddhav thackreay
Published On

सांगली : हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आमच्या पाठीशी आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंकलखाेप येथे पूरग्रस्तांना दिले. दरम्यान पूरग्रस्तांना दिलासा देताना मुख्यमंत्र्यांनी मला काेराेना वाढू द्यायचा नाही. तुम्ही गर्दी टाळा असे उपस्थितांपुढे व्यक्त करुन या भागात काेविड वाढण्याची भिती व्यक्त केली. (uddhav-thackreay-ankalhop-sangli-bhilwadi-sml80)

जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे आज (साेमवार) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

भिलवडी येथे पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे अंकलखाेप येथे पाेहचले. तेथे त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आपत्तीनंतर तुम्हाला पायावर उभं करायची जबाबदारी आमची आहे. ही अतिवृष्टी होण्यापुर्वी पासून या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. त्यामुळे कृपा करून गर्दी करू नका. मास्क घालत राहा. मला काेराेनाचा संसर्ग वाढू द्यायचा नाही. पावसाळ्यानंतर येणारे आजार होणार नाहीत यासाठी प्रशासनास सूचना दिली आहे. मी सर्वांची निवेदने घेत आहे. सर्वांच्या सूचनांचा स्वीकार करीत आहे.

तुमच्यासाठी मेडिकल कॅम्प सुरु केलेले आहेत. मला काेराेनाचा संसर्ग वाढू द्यायचा नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत तुमच्या सर्व प्रश्नांवर चर्चा केली जाईल. पूर दरवर्षी येतोय, दरवर्षी मुख्यमंत्री, मंत्री येणार आणि तुमची चौकशी करून जाणार. पुन्हा पुढच्या वर्षी ये रे माझ्या मागल्या. हे असेच आयुष्य तुम्हांला जगायचे का? असा प्रश्न पूरग्रस्तांना करुन मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कायमस्वरुपी उपयायाेजना करण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले तर ते आम्ही घेऊ. तुम्ही आमच्या पाठीशी रहा.

uddhav thackreay
'त्या' रात्री नातेवाईकांना सांगितलं, आम्ही जगलाे तर भेटू!

ज्यावेळेस प्रशासनाला अतिवृष्टीचा इशारा मिळाला त्याच वेळीस प्रशासनाने तुमच्या भागातील लोकांचे लगेच स्थलांतर केले. लाेकांचे जीव जाऊ दिले नाहीत. हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेणार असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com