'त्या' रात्री नातेवाईकांना सांगितलं, आम्ही जगलाे तर भेटू!

pethmap residents
pethmap residents

चिपळूण - वाशिष्ठ नदीने राैद्र रुप धारण केले. चिपळूणच्या बाजारपेठेसह अन्य गावांत पूराचे पाणी घुसले. यामुळे अनेकांच्या घरांचे नुकासन झाले. नदी काठी राहणारे अनेक कुटुंबांनी पाणी वाढल्याने घर साेडून सुरक्षितस्थळी जाण्याचा मार्ग निवडला. पाणी कमी झाल्यानंतर ज्यावेळेस रहिवाशी परतले त्यावेळेस घराची परिस्थिती पाहून त्यांच्या डाेळ्यांतून अश्रु वाहू लागले. आजही ताे दिवस आठवला की अंगावर काटा येताे असे रहिवाशांनी नमूद केले. (pethmap-residents-demands-canal-near-river-sml80)

पेठमाप येथील रहिवासी pethmap residents आजही खूप घाबरलेले आहेत. येथील रहिवासी म्हणाले त्या रात्री पाण्याचा प्रवाह जास्त हाेता. झाडे वाहून जात हाेती. आम्हांला समजले जमीन खचू लागली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस घरात थांबण्याचे धाडसच झाले नाही. आम्ही घराच्या गॅलरी ताेडल्या. पत्र्यावरुन शेजारच्या घरातील गॅलरीत आम्ही सात जण गेलाे.

आम्ही नातेवाईकांना सांगितले आम्ही जगलाे तर भेटू अशी अवस्था आमची हाेती. काेणीही आम्हांला घरा बाहेर काढायला आले नाही. फक्त फाेन येत हाेते. आम्ही मदतीला येताेय. पण काेणाला नाही. आम्ही पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा आम्ही पत्र्यावरुन घरात आलाे.

pethmap residents
चिपळूणात आदित्य ठाकरेंनी मदतीच्या पॅकेजचे दिले संकेत

दुस-या तिस-या दिवशी रत्नागिरी, गणपतीपुळे, पावस, खेड, मुंबई या भागातील नागरिकांनी पेठमापवासियांना खूप मदत केली. खाणपिणं सर्व पूरविले. विहिरीचे पाणी आम्ही पिऊ शकत नव्हताे. खाण्यापिण्याची साेय केली. खासदार, आमदार येऊन गेलेत. पाऊस कमी झाल्यावर लवकरात लवकर गाळ काढून देऊ. या भागात बंधा-याचे काम तातडीने मार्गी लावले जाईल असे आश्वासन दिले आहे.

हा बंधारा झाल्यानंतर आमच्या जिवितास कमी धाेका हाेईल असेही रहिवाशांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com