घराणेशाहीवरून टीकेची झोड उठवणाऱ्या भाजपच्या नेत्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. जय शहा यांचे क्रिकेटमधील योगदान काय? असा रोखठोक सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. बुलडाणा येथील जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते.(Latest News)
यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) टोला लगावला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासाथीदारांना पराभूत करायचा निर्धार आपण केला. त्यामुळे मी पाहायला आलोय. ज्या लोकांना मोठं केलं ते सोडून गेले. परंतु मला मोठं करणारे माझ्यासोबत आहेत का नाही ते पाहण्यासाठी मी आल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. जे गेले त्यांना ५० खोके लख लाभो. काही काळासाठी त्यांनी आपलं चिन्ह चोरलं असेल किंवा पक्ष चोरतील परंतु ते आपल्या कपाळवरील लागलेला शिक्का, कसा पुसणार, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली. भाजपने जेव्हा आपला शब्द मोडला तेव्हा मी अरविंद सावंत यांना राजीनामा देण्यास सांगितलं त्यावेळी सावंत यांनी एका सैन्यप्रमाणे राजीनामा दिला. परंतु पंतप्रधान मोदींनी सावंत हे राजीनामा का देत आहेत, हे विचारलं देखील नाही. ज्या शिवसेनेने संकटकाळी त्यांना मदत केली त्यांनाच ते विसरले.
ज्यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान मोदींना साईडलाईन करत होते त्यावेळी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना साथ दिली. फक्त मोदी आणि मोदी केलं जातं त्यावरच माझा संताप होतो, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. ज्यावेळी तुम्ही घराणेशाहीवर बोलता आम्ही घराणेशाही विरोधात आहोत, परंतु आम्ही तुमच्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीच्या विरोधात आहोत.
अमित शहा यांना टोला
नरेंद्र मोदी यांना परत एकदा निवडून आणलं तर ते घराणेशाही मुळापासून संपवून टाकतील, असं अमित शहा एका भाषणात म्हणाले होते. याला उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर दिलं. मेळाव्यात जमलेले लोक आमचे घराणे आहे. भाजपकडून टीका केली जाते की, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. शरद पवार यांना त्यांच्या मुलीला म्हणजेच सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. परंतु त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी लोकांनी त्यांना मते दिले पाहिजेत.
मुख्यमंत्री पद म्हणजे काय ते बीसीसीआयचं अध्यक्ष किंवा सचिव पद नाहीये. ज्यापद्धतीने जय शहाला बसवलं. आमचं घराणं प्रबोधन ठाकरे यांच्यापासून जनतेसमोर आहे. परंतु अमित शहा तुमचं आणि जय शहा यांचे क्रिकेटमध्ये असं काय योगदान आहे. जय शहा काय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होते का, ज्यामुळे तुम्ही त्यांना बीसीसीआयचं प्रमुख केलं. ज्यामुळे तुम्ही जय शहाला बीसीसीआयच्या सचिवपदी बसवलं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी टीका करताना केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.