Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा हिंगोली दौरा तडकाफडकी रद्द; समोर आलं मोठं कारण...

Uddhav Thackeray News: बुलढाण्यानंतर उद्धव ठाकरे शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार होते. मात्र, त्यांनी आपला नियोजित दौरा तडकाफडकी रद्द केला आहे.
Uddhav Thackeray Photo
Uddhav Thackeray PhotoSaam TV
Published On

Uddhav Thackeray Hingoli Tour cancelled

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसह शिंदे गटाला पराभूत करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट तयारीला लागला आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सभांचा धडाकाच लावला आहे. कोकण, छत्रपती संभाजीनगरनंतर आता उद्धव ठाकरे सध्या बुलढाणा दौऱ्यावर आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray Photo
Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून पुन्हा आंदोलनाची घोषणा; २४ फेब्रुवारीपासून गावोगावी रास्ता रोको

बुलढाण्यानंतर ते शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार होते. मात्र, त्यांनी आपला नियोजित दौरा तडकाफडकी रद्द केला आहे. यामागे मोठं कारणही समोर आलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरेंचा हिंगोली दौरा रद्द

सरकारने सगेसोयरे अध्यादेशाच कायद्यात रुपांतर करावं, अन्यथा येत्या २४ फेब्रुवारीपासून गावागावात रास्ता रोको आंदोलन करू, अशा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे. हीच बाब लक्षात घेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपला हिंगोली दौरा रद्द केल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

शुक्रवार २३ आणि २४ फेब्रुवारीपासून उद्धव ठाकरे हिंगोली दौरा करणार होते. या दौऱ्यात त्यांच्या एकूण ४ सभा होणार होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे याच दौऱ्यातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार, असं बोलले जात होते. मात्र, मनोज जरांगेंच्या इशाऱ्यामुळे त्यांना आपला दौरा रद्द करावा लागला आहे.

हिंगोली लोकसभेची जागा ठाकरे गटाला मिळणार?

दरम्यान, हिंगोली लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला आहे. हिंगोली लोकसभेची जागा महाविकास आघाडीतून आपल्याला मिळणार, असं ठाकरे गटाचे पदाधिकारी सांगत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडून सुद्धा या जागेवर दावा केला जात होता. मात्र, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता काँग्रेस देखील ही जागा ठाकरे गटाला सोडू शकते.

Uddhav Thackeray Photo
Chandrapur News: वयोवृद्ध आई-वडिलांना खोलीत नेलं, कुऱ्हाडीने सपासप वार करत संपवलं; मुलाच्या क्रूरतेनं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com