Jalgaon Electricity bills: गलती से मिस्टेक! जळगावात वीजबिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचाच फोटो!

Uddhav Thackeray photo on electricity bills: महावितरणनं जानेवारीत वितरीत केलेल्या वीजबिलांवर अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, मक्तेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.
Jalgaon News
Jalgaon News Saam Tv News
Published On

महावितरणनं जानेवारीत वितरीत केलेल्या वीजबिलांवर अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तरीही अजून, वीजबिलांवर मुख्यमंत्री म्हणून मान मात्र उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याचं दिसत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, मक्तेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.

महावितरणनं जानेवारीत वितरित केलेल्या वीजबिलांवर, अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. विधानसभेत महायुती सरकारनं बाजी मारली. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. पण वीजबिलावर मात्र मुख्यमंत्री म्हणून मान मात्र उद्धव ठाकरे यांना आल्याचं चित्र आहे.

Jalgaon News
Raj Thackery and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र? दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाहा स्पेशल रिपोर्ट

दरम्यान, महावितरणकडून दर महिन्याला वीजबिलाच्या प्रिंटची स्टेशनरी मक्तेदाराला पुरवण्यात येते. नवीन सरकारचे फोटो असलेली स्टेशनरी महावितरणेनं छापली असली तरी, मक्तेदाराने मात्र शहरात तब्बल चार हजार वीजबिले ही जुन्या कागदांवर छापली होती. याबाबत आता चौकशी सुरू झाली असून, मक्तेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.

Jalgaon News
Uddhav Thackeray On Amit Shah: अमित शहांच्या 'त्या' वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, थेट पीएम मोदींना केला सवाल

महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर, महावितरणनं नव्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोसहीत, नव्या वीज बिलाचा फॉरमॅट तयार केला होता. दरमहिन्याला हा फॉरमॅट मक्तेदाराला पाठवण्यात येतो. मक्तेदाराने मात्र तब्बल चार हजार वीजबिले ही जुन्या कागदांवर छापली आहेत. त्यामुले वीजबिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचंच चित्र आहे.

या प्रकरणानंतर मक्तेदाराला नोटीस बजावण्यात आली असून, याबाबत अधीक्षक अभियंताकार्यालयाला देखील कळवण्यात आलंय. तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com