Ambadas Danve : खेड, मालेगाव येथे झालेल्या सभेनंतर आता उद्धव ठाकरे यांची तोफ आज (23 एप्रिल)जळगाव येथील पाचोरा येथे पोहचणार आहे. आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे-भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. अशात आता जळगावात होणारी सभा उधळून लावण्याचा इशारा गुलाबराव पाटलांच्या समर्थकांनी दिला आहे. या सर्वांवर अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर खरमरीत टीका केली आहे. (Political News)
आजची सभा विराट होणार आहे. म्हणूनच शिल्लक बाजूची तंतरलेली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. खोट्या दंडात बेडक्या फुगवल्या जातायत. अशी आव्हानं परतून लावणं आमच्यासाठी फार अवघड नाही, अशा शब्दांत अंबादास दानवेंनी शिंदे गटाच्या मंत्र्यांवर आगपाखड केली आहे.
गुलाबराव पाटलांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरेंची जळगावमधील सभा उघळून देण्याचा इशारा दिल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेने आतापर्यंत कुणाच्याही सभेला अडवलेले नाही. मात्र आम्हाला कुणी आडवं जात असेल, तर आम्हालाही विचार करावा लागेल की तुमच्या सभा कशा होतील ते पाहू,असा इशारा दानवेंकडून देण्यात आला आहे.
तर कानात बोळे घाला
ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी. आम्हालाही सगळ्यांचे ज्ञान आहे. जे कोणी विरोध करत आहेत त्यांना आवाहन करेल सभा विचार ऐकण्यासाठी आहे. आपल्याला सहन होत नसेल तर कानात बोळे घाला.
दगड मारणारे हात आता बंद झाले आता गद्दारीने खोक्याचे हात झाले आहेत. दगडाचे हात आता राहिलेले नाहीत आता भ्रष्टाचाराने यांचे हात बरबटले आहेत. दगडाची भाषा यांनी करू नये, असं अंबादास दानवे म्हणाले.
कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. गुलाबराव पाटील हे पालकमंत्री आहेत त्यामुळे त्यांची देखील ही जबाबदारी आहे. तेच लोक असं वक्तव्य करत असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या दादागिरीची दखल घेतली पाहिजे. सभा ऐकायला या, पण गोंधळ कराल तर परत जसे आले तसे जाऊ शकणार नाही, असा इशारा अंबादास दानवेंनी शिंदे गटाला दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.