Ambadas Danve News: औरंगजेबचा एवढाच तिटकारा तर कबरीचा.., अंबादास दानवेंचं भाजपला खुलं आव्हान

Ambadas Danve Target BJP: ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
Ambadas Danve Latest News
Ambadas Danve Latest NewsSaam TV
Published On: 

Ambadas Danve Latest News: मुगल बादशाह औरंगजेब व टिपू सुलतान यांचे फोटो झळकावणे आणि व्हाट्सअप स्टेटस ठेवण्यावरून राजकारण सुरू असताना औरंगजेबाचे भूत सत्ताधारीच बाहेर काढत आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. भाजपला औरंगजेबाचा तिटकारा आहेत तर त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेब याच्या कबरीला असलेल्या संरक्षित स्मारकाचा दर्जा काढवून दाखवावा, असे खुलं आव्हान देखील अंबादान दानवे यांनी दिलं आहे. (Latest Marathi News)

Ambadas Danve Latest News
Maharashtra Politics: आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा; शिंदे गटाच्या नेत्याची मागणी, राजकीय वर्तुळात खळबळ

ठाकरे गटाचे नेते तसेच विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'बाटलीतून भूत' बाहेर काढावे तसा हा औरंग्या सत्ताधारीच आज शिवरायांच्या महाराष्ट्रात उभा करत आहेत. शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची तुमची जुनी सवय जनता ओळखते. मग तो औरंगजेब असो की पाकिस्तान, असं अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटलं आहे.

कारवाईची भाषा करणाऱ्यांनी संभाजीनगरात हे पोस्टर नामांतर आंदोलनात पहिल्यांदा दिसले तेव्हा त्यावर काय कारवाई केली, की विसर पडला तुम्हाला याचा? अल्पवयीन मुले यात सापडत आहेत. ते स्वतःचा मेंदू वापरून हे कृत्य करणे शक्य वाटत नाही. त्यांचा ब्रेनवॉश करणारी यंत्रणा कोण आहे याकडे 'पार्टी विथ डिफ्रन्स' जाणीवपूर्वक नजरेआड करते. मांजर डोळे मिटून दुध पिते पण तिला जग पाहत असते, हे विसरू नका, असा इशाराही दानवे यांनी भाजपला दिला आहे. (Maharashtra Political News)

हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू आहे. स्वतःला सज्जन भासवून दुसऱ्याला दुर्जन म्हणणं फार दिवस चालत नसतं. आम्हाला तर आहेच, तुम्हाला तिटकारा असेल या पापी राजाचा, तर त्याच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याची शिफारस करणारे एक साधे पत्र तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा, असं खुलं आव्हान देखील अंबादास दानवे यांनी भाजपला दिलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.