Uddhav Thackeray : ठाकरेंच्या 'मातोश्री'वर खासदारांची तातडीची बैठक; कोण नॉट रिचेबल, कोण हजर? नावे आली समोर

Uddhav Thackeray, Operation Tiger, Shiv Sena UBT : मातोश्रीवरील महत्त्वाच्या बैठकीपूर्वी ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्काबाहेर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा फूट पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Politics:
Uddhav ThackeraySaam Tv
Published On

Uddhav Thackeray emergency MPs meeting : उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षात पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. पण या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला कोण उपस्थित राहिले? कोण गैरहजर होते? याची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ खासदारांनी बैठकीपासून दुरावा घेतला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा बंडखोरी होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीपूर्वीच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे सकाळपासून 'नॉट रिचेबल' आहेत. त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्याशिवाय परभणीचे खासदार संजय जाधवही नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics:
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची धाकधूक वाढली! मातोश्रीवरील बैठकीआधीच 'हा' खासदार 'नॉट रिचेबल'

महत्त्वाचे खासदार बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता?

मिळालेल्या माहितीनुसार, केवळ भाऊसाहेब वाकचौरेच नव्हे, तर परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील यापूर्वीच्या बैठकांना गैरहजर राहिले होते. याशिवाय संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर हे खासदार आजच्या या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे काही खासदार सातत्याने पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमांना आणि बैठकांना अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले आहे.

मातोश्रीवर बैठकीला उपस्थित असणारे खासदार -

  • राजाभाऊ वाजे (नाशिक)

  • अरविंद सावंत (मुंबई दक्षिण)

  • अनिल देसाई (मुंबई दक्षिण मध्य)

  • संजय राऊत (राज्यसभा)

नॉट रिचेबल -

  • संजय जाधव (परभणी)-

  • भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) -

प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित नाहीत, ऑनलाइन हजेरी लावणार -

  • नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

  • संजय दिना पाटील (मुंबई इशान्य)

  • ओमराजे निंबाळकर (धाराशीव)

  • संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम)

काय आहे नाराजीचे कारण?

महिनाभरापूर्वी झालेल्या खासदारांच्या बैठकीत काही नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मतदारसंघात निधी न मिळणे, पक्ष नेतृत्वाकडून भेटीगाठीसाठी वेळ न मिळणे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे दौरे किंवा प्रचार फेऱ्या न होणे, अशा अनेक मुद्द्यांवर खासदारांमध्ये नाराजी असल्याचे सूत्रांकडून समजते.

Maharashtra Politics:
बीड पुन्हा हादरलं; कंत्राटदार तुकाराम मुंडेंचे परळीतून अपहरण, मुख्य सूत्रधार कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 'ऑपरेशन टायगर'?

गेल्या ७ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असताना ठाकरे गटाच्या काही खासदारांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केल्याची बातमी समोर आली होती. त्याशिवाय ऑपरेशन टायगर पूर्णत्वाच्या दिशेने जात असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला. शिंदेंच्या शिवसेनेतील एका नेत्याने आठवडाभरात ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट केला, त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले. आज मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या खासदारांचे मन वळवण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com