राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? मध्यरात्री ठाकरे आणि फडणवीसांची भेट?

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Midnight Meeting Rumors: राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे...कारण 22 एप्रिलला मध्यरात्री उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे...नेमकं भेटीत काय घडलं? खरचं ठाकरे- फडणवीसांची भेट झाली होती का?
Speculation rises in Maharashtra politics amid rumors of a late-night meeting between Uddhav Thackeray and Devendra Fadnavis at Varsha bungalow.
Speculation rises in Maharashtra politics amid rumors of a late-night meeting between Uddhav Thackeray and Devendra Fadnavis at Varsha bungalow.saam tv
Published On

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची चर्चा सुरु झालीय.. आणि ती ही एका मध्यरात्रीच्या भेटीमुळे... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मध्यरात्री 2 वाजता वर्षा बंगल्यावर गुप्त बैठक झाल्याचा दावा करण्यात आलाय... .प्रकाश आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.. त्यात या भेटीमागील कारणांचाही अंदाज बांधला जातोय..

22 एप्रिलला फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये

विधानपरिषद निवडणुकी संदर्भात भेट झाल्याची शक्यता

उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास निवडणुक बिनविरोध होणार असल्याची चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर शिंदेसेनेही उमेदवार देणार नाही

अशी या भेटीमागील कारणं सांगितली जातायत..

दरम्यान उद्धव ठाकरेंनी या भेटीवर बोलणं टाळलंय.. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेटीचा दावा फेटाळून लावत.. थेट खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना इशारा दिलाय... दरम्यान ठाकरे आणि फडणवीसांनी या मध्यरात्रीच्या भेटीच्या चर्चा जरी नाकारल्या असल्या तरी संजय राऊतांनी मात्र अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत असं म्हणतं या चर्चेचा सस्पेन्स आणखीन वाढवलाय..

मात्र ठाकरे- फडणवीसांची ही भेट 2029 च्या युतीची नांदी ठरणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी केलीय..एकूणच, या कथित मध्यरात्रीच्या भेटीने राजकीय वातावरणात उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही वाढवलयं...जोपर्यंत दोन्ही पक्षांकडून अधिकृत माहिती समोर येत नाही, तोपर्यंत या चर्चांना आणखी रंग चढण्याची शक्यता आहे. मात्र खरंच युती २.० ची ही नांदी तर नाही ना? हे येणारा काळचं सांगेल.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com