Uddhav Thackeray Video : 'पापाचा घडा लपवण्यासाठी...'; 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात

Uddhav Thackeray Latest Speech in chhatrapati sambhaji nagar :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात केला आहे. भाजप सरकार मागील १० वर्ष सत्तेत असूनही योजनांची अंमलबजावणीच केली नसल्याची टीका ठाकरेंनी केली.
 'पापाचा घडा लपवण्यासाठी...'; 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात
Uddhav Thackeray SpeechSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर :

उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त शिवसंकल्प मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी संबोधित केलं. या मेळाव्यादरम्यान माजी उपमहापौर राजू शिंदे आणि त्यांच्यासह ६ माजी नगरसेवकांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार आखपाखड केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरूनही राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, 'काल तुम्ही जिंकला असला तरी मी विधानसभेत छत्रपती संभाजीनगर जिंकणार आहे. ते ४०० पार करणारे होते. राज्यात त्यांना ९ वर आणलं. माझ्या हक्काचा खासदार छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही. या छत्रपती संभाजीनगरमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी भगव्याची बीजे रोवली. त्यांनी संपूर्ण मराठवाडा पादक्रांत केला. हक्काची छत्रपती संभाजीनगरची जागा गमवावी लागली. आपला उमेदवार कित्येक वर्षे शिवसेना एके शिवसेनेत राहिले.

हार जीत होत असते. निवडणुकीत हारलो तरी आयुष्य संपत नाही. लढण्याची हिंमत हरता कामा नये. तीन महिन्यानंतर विधानसभाची निवडणूक होती. आता कालची लढाई लोकशाही वाचवण्याची होती. संविधान वाचवण्याची लढाई होती. आता येणारी विधानसभा निवडणुकीची लढाई म्हणजे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. महाराष्ट्राचा साधू-संत, शिवप्रभूंचा आहे. मी लाचारीचा महाराष्ट्राचा होऊ देणार नाही.

 'पापाचा घडा लपवण्यासाठी...'; 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात
Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'जरी तो कार्यकर्ता...'

मी पहिल्या दिवशी म्हटलं की, हे गळती सरकार आहे. त्यांचं शेवटचं अधिवेश आहे. योजना खूप मांडल्या जात आहेत. माता-भगिनींना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी डाव टाकत आहे. विनायक राऊत, अंबादास दानवे, तुम्ही सांगत होता... आता नरेंद्र मोदी तिकडे १० वर्ष सत्तेत आहे. मागील दहा वर्षांत किती योजना अंमलात आणल्या? शेतकऱ्यांची वीज बील माफीची घोषणा केली. नुसतं वीज बील माफ करू नका. आधी थकबाकी माफ करा. त्यानंतर वीज बील माफ करा. त्यानंतर ही घोषणा करा. थकबाकीवर बोला. शेतकऱ्यांचे कनेक्शन कापत होते. थकबाकीसकट वीज बील माफ करायला पाहिजे.

 'पापाचा घडा लपवण्यासाठी...'; 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात
Maharashtra Politics : अजित पवार यांच्या 'राष्ट्रवादी'ला सर्वात मोठं खिंडार; शेकडो पदाधिकारी शरद पवारांकडे परतले

बाळासाहेब ठाकरेंनी वीज बील माफीची मागणी केली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वीज माफीची घोषणा केली. त्यानंतर शेतकऱ्यांना शून्य रकमेची वीज बिले मिळाली. त्यानंतर शिवसेनेचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत आले. त्यानंतर पुढे विलासराव देशमुख सत्तेत आले. त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना दामदुपटीने वीज बिले यायला लागली. आताही हेच चालू झालं. अनेक योजना पापाचा घडा लपवण्यासाठी योजनांचं पांघरून घालत आहे. मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com