वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli Hit And Run Case) मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिहीर शहाच्या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिहीर शहा अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'याप्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. कायदेशीररित्या कारवाई केली जाईल.', अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 'कायद्यासमोर सर्व समान आहेत. सरकारसमोर देखील सगळ्या घटनांकडे आम्ही समान पाहतो. त्यामुळे या घटनेत वेगळा न्याय दिला जाणार नाही. जे होईल ते कायदेशीर रित्या होणार आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. या घटना वारंवार होऊ नये यासाठी शासन आणि गृह विभाग उपायोजना करेल. या प्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. कायद्यापुढे सर्वजण सारखे आहेत.'
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'विरोधी पक्षांना टीका करण्यापलीकडे काही काम नाही. या घटनेत कोण कोणाला पाठिशी घातलतंय असं समजण्याची गरज नाही. जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी त्याला कोणी पाठीशी घालणार नाही. सर्वांना समान न्याय लागू करण्याचे काम आम्ही करत आहे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे.'
वरळी कोळीवाड्यामध्ये राहणारे नाकवा दांपत्य हे दुचाकीवरून ससून डॉकला मासे आणण्यासाठी गेले होते. मासे घेऊन परत घराच्या दिशेने येत असताना भीषण अपघात झाला. नाकवा यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. दुचाकीवर जास्त वजनाचे मासे असल्यामुळे नाकवा यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दोघेही कारच्या बोनेटवर पडले. अशामध्ये नाकवा यांनी लगेच बाजूला उडी मारल्यामुळे ते अपघातामध्ये बचावले. पण त्यांच्या पत्नी कावेरी यांना बाजूला होता आले नाही. कार चालकाने कावेरी यांना फरफटत नेले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर घाबरलेल्या कार चालकाने तिथे न थांबता घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या कावेरी नाकवा यांना ताबडतोब पोलिसांनी नायर रुग्णालयात उपचारासाठी हलवले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. कारमध्ये दोघे जण होते. याप्रकरणी वरळी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर कार चालवणारा तरुण फरार असून त्याचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.