Satara News : कुरतडलेली दाढी, भुरकट मिशांना पीळ देण्यापेक्षा... मिठ्या, पप्प्यावर राजेंचे शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर

शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना कमिशनबाज म्हटले हाेते.
udayanraje bhosale, shivendraraje bhosale, satara, satara political news
udayanraje bhosale, shivendraraje bhosale, satara, satara political newssaam tv

Satara News : ज्यांना जनतेने मनापासून विशेष म्हणजे कायमस्वरुपी पालिकेतून रिटायर्ड केले आहे त्यांनी सातारा विकास आघाडीने आता रिटायर्डमेंट घ्यावी असा सल्ला देणे म्हणजे चोंबडेपणा आहे. आमदारांनी आता रियल इस्टेटचा व्यवसाय मंदावला असल्यास चोंबडे सल्ले देण्याचा नवीन व्यवसाय सुरु करावा असे घणाघाती प्रत्युत्तर खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale latest marathi news) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना दिले. दाेन दिवसांपुर्वी शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा विकास आघाडी आणि खासदार उदयनराजेंवर टीका केली हाेती. त्यास उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

उदयनराजे म्हणाले प्रशासकीय राजवट लागुन आता जवळपास एक वर्ष होत आहे. नागरीकांचे मुलभुत प्रश्न सोडवण्यासाठी साविआ काहीच करीत नाही अशी आज बाेंब मारणारेच ज्यावेळी कासचे जलपुजन केले त्यावेळी साविआचा संबंध काय अशी गरळ ओकत होते.

त्याचपध्दतीने घंटागाडयांच्या अचानक बंद पुकारण्याने माजी उपनगराध्यक्ष यांनी केलेल्या मध्यस्तीवर आता यांचा संबंध काय, हे कशाला लुडबुड करतायत, यांचा स्वार्थ आहे अशी दोन्ही हाताने बोंब ठोकत होते. आता तेच साविआने लक्ष दयायला पाहिजे असे सल्ले देत आहेत. म्हणजेच प्रशासकीय राजवटीत नागरीकांची कामे होत नाहीत असे त्यांचे अप्रत्यक्ष म्हणणे आहे.

udayanraje bhosale, shivendraraje bhosale, satara, satara political news
Satara News : शिवाजीराजे भाेसलेंच्या स्मृतीप्रित्यर्थ साताऱ्यात रविवारपासून राज्य बॅडमिंटन स्पर्धा

नथीतुन तीर मारण्याचा त्यांचा प्रकार जुना आहे. दोन्ही डगरीवर हात ठेवणा-या आमदार सैरभैर झाले आहेत. त्यांना जनतेमधुन थारा मिळणार नाही याची खरी भीती वाटत असल्याने, कोणत्याही ठिकाणी आमच्यावर शब्दफेक केल्याशिवाय किंवा आगंतुक सल्ले दिल्याशिवाय त्यांना राहवत नाही.

कुरतडलेली दाढी आणि भुरकट मिशांना पीळ देण्यापेक्षा प्रेमाने कोणाला आलिंगन देणे केव्हाही चांगले. त्यांच्यासारखे निदान आमच्या पोटात एक आणि ओठात एक असे तरी नाही असा पलटवार उदयनराजेंनी (udayanraje bhosale) मिठ्या मारणे, पप्प्या घेणे या शिवेंद्रसिंहराजेंच्या (shivendraraje bhosale) टिकेवर केला आहे.

udayanraje bhosale, shivendraraje bhosale, satara, satara political news
Satara : सातारकरांना मिठ्या मारणे, पप्प्या घेणे पुन्हा सुरु हाेईल; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टाेमणा

आम्ही हत्तीच्या चालीने चाललो आहोत. भुंकणा-यांकडे आम्ही लक्ष देत नाही. जे येतील त्यांच्या बरोबरीने पालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. ज्यांच्या हातात अनिर्बंध सत्ता होती त्यांच्या काळात सातारा शहर हे अधिक पेन्शनरांचे शहर बनले होते. पेन्शनर्स सिटीचे स्मार्ट सिटीत रुपांतर करण्याचे आमचे बहुतांशी प्रकल्प यशस्वी झाले आहेत असेही उदयनराजेंनी नमूद केले.

ही सर्व कामे नागरिकांच्या हितासाठी केली असल्याने, नागरीकांची साथ कोणाला मिळेल हे येणारा काळच ठरवेल असेही उदयनराजे भोसले यांनी नमुद केले. नगद खाणे, गिळंकृत करणे, हडपणे, दडपणे, खच्चीकरण करणे, गरिबांना/झोपडपट्टीधारकांना देशोधडीला लावणे, आश्वासने देवून भुलवणे, आर्थिक नाडया आवळणे हेच त्यांचे मिशन. कुकर्मी मिशनबाज म्हणून परिचितांमध्ये आपण प्रसिध्द आहात असा टाेमणा उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंना मारला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

udayanraje bhosale, shivendraraje bhosale, satara, satara political news
Satara : कमिशनबाज..., खरं तर त्यांनी रिटायर व्हावे : शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर राेख

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com