ठाकरे गटातील आणखी ३ खासदार फुटणार? उदय सामंतांच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Politics : डिलिमिटेशन विधेयकावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना उदय सामंत यांनी ठाकरे गटातील उर्वरित तीन खासदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडतील, असा दावा केलाय.
Uday Samant's Big Claim | Will Three More Thackeray Faction Mps Defect?
Uday Samant's Big Claim | Will Three More Thackeray Faction Mps Defect?saam tv
Published On: 
Summary
  • डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय हालचालींना वेग

  • फुटीर खासदारांचा विधेयकाला पाठिंबा

  • संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली होती.

सध्या देशभरात डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय हालचालींना वेग आलाय. सर्वच पक्षांनी आपल्या खासदारांना व्हीप बजावलाय. ठाकरे गटाने आपल्या खासदारांसह इतर फुटीर ६ खासदारांनाही व्हीप जारी केलाय. मात्र, हे खासदार आधीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्याने त्यांचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात येतय. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून खासदार संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर मंत्री उदय सामंत यांनी जोरदार पलटवार करताना एक मोठा दावा केलाय.

Uday Samant's Big Claim | Will Three More Thackeray Faction Mps Defect?
केंद्र सरकारचा मोठा विजय! खासदार-आमदारांच्या संख्या वाढीच्या निर्णयाला कट्टर विरोधकाचा पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर शरद पवार गटातील खासदार फुटतील अशी भीती सुप्रिया सुळेंना आहे. म्हणून, त्यांनी डिलिमिटेशन विधेयकास पाठिंबा दिलाय, असे विधान संजय राऊतांनी केलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना उदय सामंतांनी मोठा दावा केलाय. खासदार फुटतील फुटतील म्हणत म्हणत ठाकरे गटाचेही खासदार फुटणार आहेत. शिल्लक असलेले तीन्ही खासदारही त्यांची साथ सोडतील असा दावा सामंत यांनी केलाय.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच खासदार अरविंद सावंत यांनी या विधेयकास पक्षाचा ना विरोध आहे, ना पाठिंबा अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आता ठाकरे गटातील उर्वरित तीन खासदारही विधेयकाच्या बाजूने मतदान करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Uday Samant's Big Claim | Will Three More Thackeray Faction Mps Defect?
एका तासाच्या बैठकीनंतर स्टॅलिन हॉटेलबाहेर पडले; काँग्रेसच्या मनधरणीला यश की अपयश?

दरम्यान खासदार फुटणार असल्याचा दावा करताना सामंत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पूर्वीपासूनच समन्वय नव्हता, हे अनेकवेळा आमच्यासारख्यांनी सांगितलंय. आता विधेयक उद्या मांडले जाणार आहे, फ्लोअरवर नक्की काय होतंय याची उत्सुकता आम्हालाही आहे. शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच पाठिंबा जाहीर केलाय. आमचे खासदार विधेयकाच्या बाजूने राहतील आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील.

ठाकरे गटाकडून फुटीर सहा खासदारांना व्हिप

डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाने मोठी राजकीय खेळी खेळलीय. एकीकडे काँग्रेस नेते इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे ठाकरे गटाने बंडखोरी केलेल्या सहा खासदारांना बैठकीसाठी व्हीप जारी केला. जर हे खासदार या बैठकीला गैरहजर राहिले, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.