जेवायला गेले अन् काळाचा घाला! सांगलीत दोन नर्सिंग विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; वैद्यकीय क्षेत्रात हळहळ

Sangli Islampur Two Nursing Students Drowning Incident: सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे मध्यरात्री विहिरीत बुडून दोन नर्सिंग विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशांत पाटील आणि गंगाधर सुकुरवार अशी मृतांची नावे असून स्पेशल रेस्क्यू फोर्सने दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
Sangli Islampur two nursing students drowning incident
Sangli Islampur two nursing students drowning incidentsaam tv
Published On: 

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली: ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास विहिरीच्या पाण्यात बुडून दोन तरुण नर्सिंग विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रशांत पाटील (वय २५, रा. जळगाव) आणि गंगाधर रमेश सुकुरवार (वय २४, रा. नांदेड) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघेही ईश्वरपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडून स्पेशल रेस्क्यू फोर्स – आपत्कालीन पथक, आपत्ती व्यवस्थापन सांगली यांना देण्यात आली. माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे सिनियर कमांडर कैलास वडर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Sangli Islampur two nursing students drowning incident
Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते. जेवण झाल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास ते हॉटेलबाहेर आले असता जवळील विहिरीच्या परिसरात गेले. यावेळी विहिरीशेजारी असताना अचानक पाय घसरल्याने दोघेही विहिरीतील पाण्यात पडले. पाण्यात बुडाल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने तातडीने रेस्क्यू मोहीम हाती घेण्यात आली. पथकाने आवश्यक बचावकार्य करून विहिरीतील दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

Sangli Islampur two nursing students drowning incident
Shocking : नाशिक हादरलं! इंजिनिअरने राहत्या घरी संपवलं आयुष्य, मृत्यपूर्वी लिहलं पत्र; धक्कादायक कारण समोर

मृत विद्यार्थ्यांची माहिती

१. प्रशांत पाटील, वय २५ वर्षे – मूळ राहणार जळगाव. शिक्षणासाठी ईश्वरपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये वास्तव्यास.

२. गंगाधर रमेश सुकुरवार, वय २४ वर्षे – मूळ राहणार नांदेड. ईश्वरपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होता.

दोन्ही विद्यार्थी मूळचे जळगाव व नांदेड जिल्ह्यातील रहिवासी होते. या दुर्दैवी घटनेची माहिती त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.