

संदीप भोसले
Latur News : लातूरमधून अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. बाईकवर कामावर जाण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दोन मित्रांच्या मृत्यूची बातमी ऐकून तिसऱ्या मित्राचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर-तुळजापूर महामार्गावर उजनीजवळ हा अपघात झाला. या अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. चंद्रकांत नगराळे (वय-28) आणि सुर्यदिप शिंदे (वय-24) अशी मृतांची नावं आहे.
दोघेही उजनी इथल्या एका हॉटेलमध्ये कामाला होते. नेहमीप्रमाणे दोघे आजही ते उजनी जवळच्या टाका येथून मोटारसायकल वरून कामावर निघाले होते. मात्र प्रवासादरम्यान महामार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. दरम्याना दोघांचाही जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)
या घटनेची माहिती दोघांचाही मित्र असलेल्या गोपाळ खंडाळकरला मिळाली. मात्र याचा त्याला जबर मानसिक धक्का बसला. यामुळे त्याचाही उजनी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी या तिघा मित्रांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Breaking Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.