सांगलीत भीषण अपघात; अडीच वर्षीय चिमुरडा  ठार, 7 किलोमीटर नेले फरफटत

धावडवाडी गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अनेक वाहने ये जा करतात.
Sangali Accident
Sangali Accident Saam TV
Published On

सांगली: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील धावडवाडी जवळ झालेल्या अपघातात अब्दुल समद साजिद शेख हा अडीच वर्षीय चिमुरडा ठार झाल्याची घटना काल रविवारी घडली आहे. तर सात किलोमीटर चिमुरड्याला चालकाने फरफटत नेले आहे. साजिद खान नालसाब  शेख व जबीन शेख हे दांपत्य कामानिमित्त धावडवाडी गावात बुलेट गाडीवरून आपल्या अडीच वर्षीय चिमुरड्याला घेऊन गावात आले होते. धावडवाडी गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अनेक वाहने ये जा करतात. शेख दांपत्य आपले काम आटपून शेताकडे जात असताना महादेव मधुकर कुंडले रा जालील्हाळ खुर्द हा चालक आपली इंडीका गाडी घेऊन मोकाशी वाडी येथील भाडेखोर यांना घेऊन सांगलीकडे निघाला होता.

Sangali Accident
मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला! प्रमोद सावंत यांच्या हाती गोव्याची सूत्रं

धावडवाडी जवळ शेख दांपत्य आपल्या चिमुरड्या मुला समावेत शेताकडे जात असताना त्यांच्या बुलेट गाडीला इंडीका गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत साजिद खान शेख (२७) व जबीन शेख (२५) हे दोघे दांपत्य जागेवर खाली कोसळले आणि अडीच वर्षीय अब्दुल समद शेख हा चिमुरडा इंडिका गाडीच्या धडकेत ठार झाला व हेडलाईटला अडीच वर्षीय अब्दुल शेख हा चिमुरडा अडकल्याने चालकाने सात किलोमीटर पर्यंत चिमुरड्याला फरफटत नेले. चोरुची गावानजीक आल्यानंतर त्याला लक्षात येताच त्याने गाडी थांबवून त्या चिमुरड्याला खाली उतरवले. तोपर्यंत गावकर्‍यांनी त्या इंडीका गाडीचा पाठलाग करून त्या वाहन चालकाला बेदम मारहाण करत कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.

यामध्ये साजीद खान शेख व जबीन शेख हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवर उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर इंडीका चालक महादेव कुंडले यांच्या वर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com