

तुळजापूरमध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोन तरुणांना मारहाण
धाराशिवमध्ये मारहाणीत समीर जब्बार पटेल याचा मृत्यू
तुळजापूर मारहाण प्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल
धाराशिवच्या तुळजापूरात प्रेम प्रकरणाच्या संशयातून २ तरुणांना अंग काळं-निळं होईपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीत समीर जब्बार पटेल याचा मृत्यू झाला. तर अरबाज अफसर सय्यद हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे धाराशिवमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज सय्यद हा तुळजापूर शहरात चहा पीत बसला असताना तिघांनी त्याला बळजबरीने कारमध्ये बसवून शिंदे महाराज यांच्या शेतात नेले. तेथे त्याच्या तोंडावर आणि पाठीवर अंग काळं-निळं होईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर मोबाईलचा पासवर्ड घेऊन मोबाईलची तपासणी करण्यात आली. मोबाईलमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नसतानाही त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली असे जखमी तरुणाचे म्हणणे आहे.
अरबाजच्या खिशातील १० हजार रुपये काढून घेत, ‘तू आमच्याच भागात कमावतोस आणि आमच्या मुलींना त्रास देतोस,’ असा आरोप करत तब्बल २ तास त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर समीर पटेलला घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. तेथे १५ ते २० जणांच्या टोळक्याने त्यालाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत समीरचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अरबाजलाही मृत समजून तुळजापूर शहरातील पार्किंग परिसरात आणून टाकण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.