Amravati Accident News : पुलावरून ट्रक कोसळला, नागरिकांची घटनास्थळी जमली माेठी गर्दी

घटनास्थळावरुन तिघांना उपचारार्थ रुग्णालयात नेले.
amravati, truck accident
amravati, truck accidentsaam tv

- अमर घटारे

Amravati Accident News : अकोटहून दर्यापूरकडे निघालेला ट्रक रात्री दाेन वाजता पुलावरून कोसळला. या अपघातात (accident) तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. (Breaking Marathi News)

amravati, truck accident
MSRTC Bus Accident : प्रवाशांचे प्राण वाचविण्यात चालकास यश; चंद्रपूर - आंबाजोगाई बसला अपघात, ३० जखमी

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलावरून खाली कोसळला अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. या ट्रकने पुलाच्या बाजूला असणा-या एक टपरीचे देखील नुकसान केले आहे. आज सकाळी अपघातग्रस्त ठिकाणी नागरिकांची (citizens) माेठी गर्दी झाली हाेती.

amravati, truck accident
Pune Crime News: कोयता गँगचा धुडगूस कायमचा बंद?; कोयते पुरवणाऱ्यांचाच केला बंदोबस्त

या ट्रकमध्ये (truck) यात्रेतील झुलेचे साहित्य असल्याचे आढळून आले आहे. मुख्य रस्त्यांवर किरकोळ वाहतूक ठप्प झालेली आहे. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झालेला नसल्याची माहिती मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com