Heartbreaking : विद्यार्थ्याला वाचवताना शिक्षकाचा बळी; वेरूळ लेणी परिसरात दुर्दैवी घटना

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ लेणी परिसरात रविवारी दुर्दैवी घटना घडली. सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्याला वाचविताना शिक्षकाने देखील जीव गमावला. जोगेश्वरी कुंडातील या घटनेमुळे गावभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
Heartbreaking : विद्यार्थ्याला वाचवताना शिक्षकाचा बळी; वेरूळ लेणी परिसरात दुर्दैवी घटना
Sambhajinagar News Saam Tv
Published On
Summary
  • वेरूळ लेणी परिसरातील जोगेश्वरी कुंडाजवळ दुर्दैवी घटना

  • विद्यार्थ्याला वाचविताना शिक्षकासह दोघांचा बुडून मृत्यू

  • गावभर हळहळ, शिक्षकाचे बलिदान स्मरणात राहणार

  • कुंड परिसरात सुरक्षा उपाययोजना नसल्याने नागरिकांत नाराजी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि जागतिक कीर्तीचे वेरूळ लेणी परिसर एका दुर्दैवी घटनेमुळे हादरले. विटखेडा येथील खाजगी क्लासेसचे नऊ विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक लेणी पाहण्यासाठी आले होते. यादरम्यान विद्यार्थ्यांपैकी एकाचा पाय घसरून तो जोगेश्वरी कुंडात पडला आणि त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात शिक्षकाने देखील आपला जीव गमावला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गावभर हळहळ व्यक्त होत आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव चेतन संजय पगडे (वर्षे १७) असून शिक्षकाचे नाव राजवर्धन अशोक वानखेडे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विटखेडा येथील खाजगी क्लासेसचे नऊ विद्यार्थी सहलीसाठी वेरूळ लेणी परिसरात गेले होते. लेणीची पाहणी झाल्यानंतर ते डोंगरावरील प्रसिद्ध जोगेश्वरी कुंडाजवळ गेले. या वेळी विद्यार्थी चेतन पगडे हा कुंडाच्या काठावर उभा असताना अचानक पाय घसरून पाण्यात पडला. चेतन पाण्यात तडफडताना पाहून शिक्षक राजवर्धन वानखेडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता कुंडात उडी घेतली.

Heartbreaking : विद्यार्थ्याला वाचवताना शिक्षकाचा बळी; वेरूळ लेणी परिसरात दुर्दैवी घटना
Sambhajinagar : पाण्याच्या प्रवाहात नदीत मधोमध अडकली कार; भाविकांचा जीव टांगणीला, सुखरूप बाहेर काढण्यात यश

मात्र पाण्यात बुडताना घाबरलेल्या चेतनने आपल्या शिक्षकाला घट्ट मिठी मारली. त्यामुळे चेतनसह शिक्षकाचाही तोल गेला आणि दोघेही खोल पाण्यात बुडाले. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून इतर विद्यार्थी भयभीत झाले. कुंडाजवळ असलेल्या काही गुराख्यांनी तातडीने धाव घेऊन मदतीचा प्रयत्न केला. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर चेतन आणि शिक्षक राजवर्धन यांना मृत घोषित केले.

Heartbreaking : विद्यार्थ्याला वाचवताना शिक्षकाचा बळी; वेरूळ लेणी परिसरात दुर्दैवी घटना
Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये मतदार यादीत मोठा घोळ, २३ हजार मतदारांची नावं दोन ठिकाणी

या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच गावातील नातेवाईक, पालक आणि स्थानिक नागरिक रुग्णालयात धावले. विद्यार्थ्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com